पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुरु. असतें; आणि ज्या वेळीं हा सूर्याच्या फार जवळ येतो, त्या वेळी याचें अंतर ४५ कोटि ९० लक्ष मैल असतें. पृथ्वी सूर्यापासून सुमारें ९ कोटि ३० लक्ष मैल दूर आहे; तेव्हां आपणांपासून गुरु सुमारें ४० कोटि मैल लांब आहे ! सूर्याभोंवतीं फिरण्यास गुरूस सुमारें १२ वर्षे लागतात; ह्मणजे गुरूवरील एक वर्ष आपल्या बारा वर्षांएवढें असतें. गुरूचा व्यास पूर्वपश्चिम ८८००० मैल व दक्षिणोत्तर ८३००० मैल आहे. यावरून गुरु हा ग्रह अगदीं पूर्ण गोल नसून ध्रुवांकड़े पृथ्वी जशी नारिंगाप्रमाणें चपटी आहे, तसा चपटा आहे. हा गुरूचा ध्रुवांकडील चपटेपणा आपल्या पृथ्वीच्यापेक्षां फारच अधिक आहे, ह्मणून दुर्बिणींतून पाहिलें असतां गुरूचा आकार २५ व्या आकृतींत दाखविल्या- प्रमाणें स्पष्ट अंडाकृति दिसतो. आपल्या आंसावर फिरण्यास गुरूला ९ तास ५५३ मिनिटें इतका वेळ लागतो; ह्मणजे सुमारें ५ तासांचा दिवस व ५ तासांची रात्र याप्रमाणें गुरूवर दिवसरात्रीचें मान असावें असे दिसून येतें. पृथ्वीला आपल्या आंसावर फिर- ण्यास २४ तास लागतात; त्यामुळे आपल्या येथें दिवसरा- त्रीचें मान बारा बारा तासांचें असतें. गुरूवर फक्त पांच तासांचीच सर्व रात्र असल्यामुळे तेथील लोकांची झोपेच्या संबंधानें मोठी त्रेधा उडून जात असेल ! पृथ्वीवरील अहो.