पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ख्रिस्ताची भक्ती होतीच. पुन्हा त्याने बेथलेहेमची वाट पकडली. ख्रिस्तजन्माच्या वेळी आपण बेथलेहेमला पोचू शकलो नाही, पण आतातरी आपण तिथे जाऊ व त्याचं दर्शन घेऊ, ह्या आशेवर. शेवटी एकदाचा तो बेथलेहेमला पोचला. पण नेमक्या त्याच दिवशी ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं होतं. ख्रिस्ताचा पहिला शिष्य बनण्याऐवजी सुळी दिलेल्या ख्रिस्ताला सुळावरून उतरवण्याचं काम त्याच्या नशिबी आलं! 'मी ख्रिस्ताच्या त्या चौथ्या शिष्याप्रमाणे आहे, माझ्या कष्टांचं फळ मला कधीच मिळणार नाही आणि लहानपणापासूनच मी हे ओळखून आहे,' असं शरद तेव्हा म्हणाला होता."
 श्रेयविहीनतेची ही जाणीव जोशींच्या भावी आयुष्यातही पुनःपुन्हा डोकावते.

 शरद जोशी यांनी नंतर केलेल्या लेखनात स्वित्झर्लंडबद्दल तुरळक असे काही उल्लेख आहेत. एकूणच तो देश इतका समृद्ध आणि विशेष म्हणजे सुशासित असा आहे, की अडचणी अशा फारशा काहीच येत नाहीत; क्वचित कधी एखादी अडचण आली, तर किती तत्परतेने शासन आपत्तिनियोजन करते हे सांगताना जोशी लिहितात :

एकदा स्वित्झर्लंडमध्ये भर उन्हाळ्यात तीन आठवडे (या मोसमात एरव्ही तिथे पडणारा) पाऊस पडला नाही. लगेच सगळ्या माध्यमांतून धोक्याच्या सूचना खणखणू लागल्या – 'जंगलाजंगलातील गवत सुकेसुके, कोरडे झाले आहे; आगीचा धोका आहे. सिगारेटचे थोटूक प्रवासात इकडेतिकडे टाकू नका. एकदा आल्प्समधील एक शिखर सर करण्यासाठी आठ लोकांची टोळी गेली होती. बर्फाच्या वर्षावामुळे ती अडकून पडली. त्यांना सोडविण्यासाठी अवघ्या तासाभरात helicopters अपघातस्थळी जाऊन पोचली. अडकलेल्या गिर्यारोहकांच्या सुटकेचा तो सारा प्रचंड खटाटोप घरोघर लोकांनी टेलेव्हिजनवर प्रत्यक्ष पाहिला. असेच एकदा लष्करी सुरुंग पेरण्याच्या प्रदेशात एकदा एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू चुकून शिरले, तर त्याच्या सुटकेच्या प्रयत्नांवर सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले.

(शेतकरी संघटक, २१ ऑक्टोबर १९९३)

 तेथील सरकार किती संवेदनशील व तत्पर आहे हे ह्यातून जाणवते.
 ह्याच लेखात पुढे जोशी यांनी केलेले एका भेटीचे वर्णन वाचनीय आहे. बर्न शहरातील एका नागरी सुरक्षेच्या केंद्रास त्यांनी दिलेली ही भेट होती. सर्वसामान्य प्रवासी अशा गोष्टी सहसा कधी बघू शकणार नाही; पण युनायटेड नेशन्समध्ये काम करताना ज्या सवलती मिळतात, त्याचा बहुधा हा फायदा होता.

 कधीकाळी कोणा शत्रूचे आक्रमण झालेच, तर त्याला रोखण्यासाठी अनेक मार्ग सरकारने तयार ठेवले होते. त्यांतला एक महामार्गांचे पट्टेच्या पट्टे बाजूला काढण्याचा व शत्रूची वाहतकच अशक्य करून सोडायचा होता. महामार्गांचा वापर लष्करी विमानांसाठी धावपट्टीसारखा करण्याचीही एक आपत्कालीन योजना होती. हे सारे ठाऊक असूनही त्या

डोंगरकुशीतल्या नंदनवनात६७