पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य, त्यासाठीच हवा शेतीमालाला वाजवी दाम. शेतकऱ्याला त्याचा हा पिढ्यानुपिढ्या चिरडला गेलेला स्वाभिमान परत मिळवून देणे हे शरद जोशींचे फार मोठे योगदान आहे.
 राजू शेट्टी यांनी काढलेल्या नव्या संघटनेचे नावही त्यांनी 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' ठेवले; नावातच हा स्वाभिमान समाविष्ट केला, हे लक्षणीय आहे.

 आपल्या भाषणांतून आणि लेखांतून शरद जोशींनी जे विचारधन मागे ठेवले आहे, त्याचे खरे मूल्यमापन पुढच्या पिढीतच बहुधा होऊ शकेल. त्यांचा हा वैचारिक वारसा त्यांच्या आंदोलनाच्या वारशाइतकाच महत्त्वाचा आहे; त्यांनी भावी पिढ्यांसाठी मागे ठेवलेला मोठा खजिनाच आहे. भविष्यातही जेव्हा जेव्हा आपण नव्या दिशांचा शोध घेऊ. तेव्हा तेव्हा त्यांचे हे विचार आपल्याला उपयुक्त ठरणारे आहेत.


                                      साहित्य आणि विचार - ४61