गळ घालणाऱ्यांच मोठी झुंबड उडते. आपट्यांना 'याची देही याची डोळां' ज्ञानेश्वर विद्यापीठांत प्रवेश मिळावा यासाठी झुंबड उडालेली पहायला मिळाली; कृतकृत्य वाटले.
आपटे हा माणूसच मोठा अफलातून. ही असली विक्षिप्त माणसे पुण्याच्या आसपास खूप पिकतात; जातिवाचक उल्लेख करायचा तर चित्पावनांत.
अगदी तरुण वयात वडीलबंधू नारायण आपटे यांच्या, गांधी खुनाच्या कटातील भूमिकेमुळे साऱ्या घरावर एक सावट आलेले; पण विद्यार्थी मनोहरने आपल्या बुद्धीच्या तल्लखपणाने अभियांत्रिकीच्या एका विशेष क्षेत्रात प्रावीण्य मिळविले; एवढेच नाही तर, त्या क्षेत्रात एक अभिनव उद्योग प्रकल्प यशस्वी करून दाखविला.
लोकमान्य टिळक म्हणायचे, "कल्पना काय, पैशाची अफू घेतली, की पासरीभर कल्पना सुचतात." आपट्यांची कल्पकता लोकविलक्षण, पण अशा कल्पना जमिनीवर उतरवून दाखविण्याची त्यांची हातोटीही तितकीच लक्षणीय. गेली पंचवीसतीस वर्षेतरी मी खुल्या व्यवस्थेचा विचारवंत म्हणून लोकांच्या डोळ्यासमोर आहे. प्रत्येक मनुष्यप्राणी अनन्यसाधारण आहे, विश्वातील गूढ सत्याचा शोध तो आपापल्या अनन्यसाधारण प्रयोगशाळेत करीत असतो. अंतिम सत्य कोणा परमेश्वरी अवताराला कळलेले नाही, प्रेषिताला कळलेले नाही. ते कळले असल्याचा दावा मांडणाऱ्या लोकाग्रणींनी मनुष्यजातीचे नुकसान केले. मनुष्यजातीची जी प्रगती झाली ती आपल्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याच्या अव्याहत खटाटोपात असणाऱ्या माणसांनी केली. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राखणे यापरता सत्यशोधनाचा आणि कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. आपले स्वातंत्र्य जोपासताना दुसऱ्याच्या पायावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याखेरीज स्वातंत्र्याच्या मूलतत्त्वाचा काहीही अपवाद नाही." अशी मांडणी मी करीत आहे. भस्मासुराप्रमाणे, सरकार ज्याला ज्याला स्पर्श करील त्याचा त्याचा विनाश घडवील या विचारावर मी शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केले. ग्रामीण स्त्रियांची मोठी आघाडी उभी केली. स्वतंत्रतावादाचा मी खंदा पुरस्कर्ता; पण आपटे भेटले म्हणजे आपली स्वतंत्रतेवरील निष्ठाही थोडी कच्ची तर नाही असा माझ्या मनात प्रश्न उभा राही. मी स्वतंत्रतेचा मूलतत्त्ववादी आहे, आपटे स्वतंत्रतेच्या विश्वासाने ओतप्रोत भरलेले.
इतर कोणाशीही चर्चा करायची म्हणजे स्वतंत्रतेच्या मूलसिद्धांताचा काथ्याकूट कण्यातच 'घडाभर तेल' संपून जायचे. 'It is not the business of the government to do business' .आणि 'Power corrupts and absolute power corrupts
अंगारमळा । ९३