पान:अंगारमळा (Angarmala).pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'तुम्ही हे लेख वाचता?', 'म्हणजे काय? आम्ही गावात सार्वजनिक वाचन करतो आणि माझी तर वाक्येच्या वाक्ये पाठ आहेत.' असे सांगून त्याने कितीतरी वाक्ये म्हणून दाखवली. मला खूप बरं वाटलं. इतक्या उपद्व्यापाने फेकलेले बियाणे, मावळातील सगळ्या डोंगरमाथ्यावर एका ठिकाणी तरी रुजत असेल तरी सगळ्या कष्टांचे चीज झाले.

(साप्ताहिक आठवड्याचा ग्यानबा, १ मार्च १९८८)

■ ■ 

अंगारमळा \ १९२