पान:अंगारमळा (Angarmala).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या आतल्या स्वरूपाचे दर्शन फक्त एकदा घडले. चांदवड अधिवेशनाच्या आधी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने संघटना सोडून दिली. एवढेच नव्हे तर बायकोने अधिवेशनात भाग घेऊ नये म्हणून तिला भयानक मारहाण केली. शिव्या दिल्या, अगदी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर. या प्रसंगाची माहिती सांगताना अनिल माझ्या खांद्यावर डोके ठेवून अक्षरश: ढसाढसा रडला. त्या बाईंना मारले म्हणून नाही, तर हा सगळा प्रसंग संघटनेचे कार्यकर्ते काही न करता थंडपणे पहात राहिले म्हणून.

(साप्ताहिक आठवड्याचा ग्यानबा दि. २१ मार्च १९८८)

■ ■ 

अंगारमळा \ १८६