पान:अंगारमळा (Angarmala).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिकवावे, कामधंद्यास लावावे आणि शेवटपर्यंत वैद्यकीय सेवा पुरवावी, याचे ओझे समाजासच पेलणार नाही.

 एड्सची लागण झालेल्यात अनेक शुद्ध चारित्र्याचे लोकही आहेत. रक्तपेढ्यांच्या, दंतवैद्याच्या किंवा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे HIV पॉझिटिव्ह झालेल्यांची संख्याही कमी नाही. पण तरीही, एका बाजूने अंकुरत्या गर्भाची सरसहा कत्तल करावी आणि दुसऱ्या बाजूला स्वत:च्या बदचलनाने रोग ओढवून घेण्याऱ्या लोकांना कोट्यवधी रुपये खर्चुन आटापिटीने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा, हे तर्कशास्त्र मला काही समजेना. मी त्या कार्यकर्त्याला जुन्या ओळखीचा फायदा घेऊन याबद्दल सरळ प्रश्न विचारला. त्यानेही तितक्याच खुलेपणाने उत्तर दिले,

 "काय बरे, काय वाईट, सरकार ठरवेल. सध्या आमच्या संस्थेला निधी मिळतो आहे आणि त्यातून दहावीस लोकांना पोटाला लावता येईल ना?"

 स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी खरेच आत्मचिंतन केले आणि त्यांच्या तोंडून एवढा जरी कबुलीजबाब मिळाला, तरी 'वाल्या'चा 'वाल्मीकी' बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू होईल.


(अंतर्नाद, दिवाळी १९९९)

■ ■ 

अंगारमळा । १७६