पान:अंगारमळा (Angarmala).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

moral snetiments ही देखील मांडली. तिच्यावरही माझा विश्वास आहे. इतरांसाठी काहीतरी करावे, हीदेखील स्वार्थाप्रमाणेच एक मूलभूत मानवी प्रेरणा आहे, असे मी मानतो. आपल्या भोवतालच्या दु:खी माणसाच्या जागी स्वत:ला कल्पणे, त्यातून त्याच्या दु:खांची अनुभूती घेणे आणि ते दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करणे हीदेखील एक मानवी प्रेरणा आहे हे मला मान्य आहे. ॲडम स्मिथच्या enlightened self-interest मुळे जगात हाहाकार उडणार नाही याचे कारण moral sentiments या मध्ये आहे. परंतु याचा आणि आजच्या स्वयंस्फूर्त कार्याचा काहीही संबंध नाही.

 आजवरच्या सामाजिक इतिहासाचा आपण जर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल, की ज्या प्रकारचा विकास या कार्यातून घडायला हवा, त्या प्रकारचा विकास या कार्यातून कधीही साधला जाणे शक्य नाही. विकासामागच्या प्रेरणा या अगदी वेगळ्या असतात. या देशातील जे स्वयंस्फूर्त कार्य गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मी बघितले, त्यावरून माझे अशा कार्याविषयीचे मत प्रतिकूल बनले आहे. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वत:ची सोय पाहत राहणे, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅच वर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची आत्ममग्न प्रवृत्ती हे सगळे विचारात घेता, अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मी एक पराकोटीचा व्यक्तिवादी, individualist माणूस आहे. व्यक्ती हेच विचाराचे केंद्र आहे, समाजाचे केंद्र आहे, निर्मितीचे केंद्र आहे. व्यक्तीची काळजी घेतली तर समाजाची काळजी घ्यायची काहीही आवश्यकता नाही.

 समाजसेवेच्या प्रेरणा कितपत विशुद्ध आहेत, याचा कस लावण्यासाठी एक साधी कसोटी आहे. जो एक विशेष प्रश्न सोडवण्याचा आविर्भाव असतो, त्या प्रश्नाच्या मुळावर घाव घातला आणि तो प्रश्नच संपवून टाकला, तर त्या कामातल्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय असेल? कामगारचळवळींनी वारंवार पगार वाढले, बोनस वाढले, सवलती वाढल्या तरी कामगारांची 'नाही रे' ही परिस्थिती कायमच राहणार. समाजवाद्यांनी कामगारांच्या शोषणाचा प्रश्न हाताळण्याची पद्धत अशी काढली, की कामगारांचे शोषण चालूच राहावे. गरीबीच राहणार नाही असे म्हटले तर समाजवादी अशी शक्यताच नाकारतील. फार तर, क्रांतीनंतर 'नाही रे'च्या हुकूमशाहीतच मालमत्तेच्या हक्काचे संबंध उलथेपालथे झाल्यानंतर गरिबी संपू शकेल, असा ते वितंडवाद घालतील; पण, 'नाही रे'च्या हुकूमशाहीपेक्षा त्यांना 'आहे रे' बनवून 'आहे रे'ची लोकशाही तयार होण्याची शक्यता ते मुळात फेटाळून

अंगारमळा । १७४