पान:अंगारमळा (Angarmala).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठी चालना मिळाली. कोलंबसने अमेरिका शोधली तीदेखील तिथल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी नव्हे. तर व्यापारातून होणारा फायदा वाढावा म्हणून. Cupidity often brings greater benefits than greatness (महानतेपेक्षा खूपदा स्वार्थातून माणसाचा जास्त फायदा होतो.)

 आपण सर्व 'युद्ध नको, युद्ध नको' असे म्हणत असतो; पण या युद्धामुळेच विकासाला सर्वांत जास्त चालना मिळाली आहे असे समाज सांगतो. सगळे जग जवळ आणणारे आजचे Computers, Internet किंवा अन्य सेटेलाईट कम्युनिकेशन किंवा अगदी विमाने हीसुद्धा युद्धासाठी केलेल्या प्रयत्नांतूनच झालेली निर्मिती आहे. तुमच्यातील जे सर्वोत्कृष्ट असते ते युद्धप्रसंगी नेहमीच उफाळून येते. War brings out the best in men.

 खूपदा माझ्याकडे अनेक तरुण मंडळी, 'आम्हाला शेतकऱ्यांची सेवा करायची आहे,' असे म्हणत येतात. शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे वगैरे उद्योगधंदे त्यांना सुरू करायचे असतात. "आम्हांला स्वत:ला याच्यातून काही नकोय," असा त्यांचा दावा असतो. पुन्हा एकदा तीच 'आर्तिनाशनम्'ची भाषा!

 मला अशा लोकांची खूप भीती वाटते. मी त्यांना म्हणतो, "तुम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणून काही करू नका. तुम्हांला जे काही करायचे असेल ते स्वत:च्या भल्यासाठी करा.' दुसऱ्याचे भले करायला निघालेली मंडळी जवळ आली, की माझी आवडती लेखिका आयन रॅन्ड हिच्या शब्दांत सांगायचे तर, "Laper's bells start ringing"

 मी 'युनायटेड नेशन्स' मधली नोकरी सोडून येथे आलो त्याचे कारण माझी बुद्धिनिष्ठा हे आहे. गरिबीचा उगम नेमका कुठे आहे, याचा मला शोध घ्यायचा होता. स्वत:च्या शेतात राबता राबता मला त्याचा शोध लागला. शेतावरून उठलो ते थेट कांद्याच्या आंदोलनाला बसलो. अंगावरची जीन्स काढून खादीचा कुडता-पायजमा चढवण्याइतकी फुरसतही मला तेव्हा नव्हती. मागे परतायचे सगळे रस्ते, सगळे बंध मी तोडून टाकले, 'शेतीमालाला रास्त भाव मिळायला हवा' या एकमेव कामासाठी स्वत:ला झोकून दिले.

 Nothing is sweeter than the smell of the burnt bridges असे म्हणत त्याचा मी गेली वीस वर्षे अनुभव घेतो आहे.

 ॲडम स्मिथचे The wealth of nations हे माझे आवडते पुस्तक आहे. भांडवलशाहीचा पाया या पुस्तकाने घातला; पण याच लेखकाने नंतर Theory of

अंगारमळा । १७३