पान:अंगारमळा (Angarmala).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अशी आम्ही गद्य माणसे असल्यामुळे, नानासाहेब गोरे म्हणाले त्याप्रमाणे, आमच्याकडे कवि माणसे वळत नाहीत, तयार होत नाहीत.

 मी शेतकरी जीवनाचे उदात्तीकरण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काय ते खेड्यातले जीवन, काय ती हिरवी झाडे, काय ती स्वच्छ हवा, कसे ते झुळझुळ झुळझुळ वाहणारे पाणी, शेतावर असणे म्हणजेच परमेश्वराच्या सानिध्यात असणे वगैरे सांगण्याचा वाह्यातपणा मी काही केला नाही.

 शेतकरी असणे ही एक जीवनपद्धती आहे. इतिहासाच्या एका ठरावीक काळामध्ये तिचे महत्त्व होते; पण पुढे, जितकी माणसे शेतीतून निघून बिगरशेती व्यवसायाकडे वळतील तितका त्या समाजाचा विकास आहे. फक्त, शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेले वरकड. मूल्य लुटून नेणारे, शेतकऱ्यांची संपदा लुटून नेतात आणि शेतकऱ्याला मागे ठेवतात. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांतील महत्त्वाची आकडेवारी कोणती? शेतीवरील लोकसंख्या जवळजवळ कायम - ७४ ऐवजी ७० %- आहे; आणि शेतीचा राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा मात्र ६४ % वरून आज २३% वर आला आहे. शेतीतील मालमत्ता बाहेर घेऊन जायची आणि माणसे तिथेच ठेवायची, हे होऊ नये, हे इतिहासाच्या विरुद्ध आहे, हे निसर्गाच्या विकासाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे अशी मांडणी आम्ही करत आलो.

 सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक Don Quixote लपलेला असतो, एक स्वप्नरंजन असते, प्रत्यक्षात न जमलेले भव्य दिव्य असे काही तरी आपण करत असतो. अशी छुपी : आत्मवंचना असते. वेळोवेळी असे अनेक Don Quixote माझ्या स्वत:च्या मनामध्येही निर्माण झालेले आहेत. कधी कधी मी स्वत:ला सॉमरसेट मॉमच्या The moon and six pence या कांदबरीतील Stock broker नायकाच्या जागी कल्पिलेले आहे. तर कधीकधी मी शरदबाबूंच्या सव्यसाची मधील डॉक्टर बनलो आहे. कधी कधी मी स्वत:ला एखाद्या आध्यात्मिक प्रेषिताच्या जागी कल्पिलेले आहे. या सगळ्या अनुभवांतून मी स्वत: गेलेलो असल्या कारणाने स्वयंस्फूर्त क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधला Don Quixote मला लगेच ओळखू येतो.

 मला वाटते, माणसाची खरी प्रगती अगदी वेगळ्या कारणांतून होत असते. इतिहासाचा प्रवाह ही भिंत पाडण्याकडे आहे; परंतु समाज मान्यता देतो ती मात्र भिंती उभारणाऱ्यांना मग ती भिंत राष्ट्राची असो, धर्माची असो, जातीची असो की भाषेची. तैमूरलंग, चेंगीझखान, औरंगजेब, नादीर शाह यांना आपण क्रूरकर्मा ठरवले आहे; पण त्यांनी जगभर केलेल्या स्वाऱ्यांमुळे भिंती पाडण्याच्या या ऐतिहासिक विकासप्रक्रियेला

अंगारमळा । १७२