पान:अंगारमळा (Angarmala).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येत नाही; रस्ता ओलांडत असताना एखादी गाडी करकचून ब्रेक लावून थांबली असेल तर तेवढंच लक्षात राहतं. तेव्हा, महत्त्वाच्या ज्या गोष्टी अनुभवाला येतात त्याच साहित्यात नोंदल्या जातात. त्यामुळे, शेतकरी जीवनात जितकं नवनवीन घडलं असेल तितकंच साहित्यात उतरेल हे मला माहीत आहे; पण महाराष्ट्राच्या ग्रामीण साहित्याचा वारसा सांगताना, गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रातील शेतकरी जीवनात जे घडलं ते पूर्णपणाने न येवो, पण त्याची छटाही ग्रामीण साहित्यात दिसत नाही, हे का? बीजिंग परिषदेच्या नावाने जगभरच्या महिला जमा झाल्या आणि त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यात म्हटको की बायांना स्वातंत्र्य नको, स्वातंत्र्य मिळालं तर बायांचं नुकसान होतं. महाराष्ट्रातल्या शेतकरी महिला एकमेव अशा, की शिक्षणात मागे पडो की आरोग्यात मागे पडो आम्ही स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचं मानतो. ज्या ज्या प्राण्याला जीव आहे तो स्वतंत्रतेवर जगतो. ही बाई ग्रामीण साहित्याला कशी दिसली नाही?

 मागे, मला दिल्लीच्या एका महाराष्ट्रीयन विद्वानानं सांगितलं, "हल्ली कोणीही उठतो आणि डंकेल प्रश्नावर बोलतो; कोणी काही वाचलेलं नसतं किंवा डंकेल प्रस्ताव पाहिलेला नसतो. डंकेल साहेब आहे, राक्षस आहे, तो तुमचं बियाणं काढून नेईल, गाईचा गोऱ्हा ओढून नेईल, - काय तोंडाला येईल ते सांगावं. फक्त सभागृहामध्ये कोणी लाल बिल्लेवाला बसला नाही ना पाहावं आणि वाट्टेल ते बोलावं !" शेतकरी संघटना ही आंदोलनापेक्षाही महाराष्ट्रातलं महाप्रचंड विद्यापीठ आहे याचं हे प्रमाणपत्र नाही काय? एक संपूर्ण वेगळा विचार संघटनेनं दिला. जे विद्वानांना समजत नाही ते अर्थशास्त्र शेतकऱ्याघरच्या अर्धशिक्षित/अशिक्षित पोराला समजू लागलं. याची आपल्या साहित्यात काही छटा उमटावी अशी आम्ही अपेक्षा ठेवली तर ती चूक होईल; पण माफी न करण्याइतकी चूक होईल?

 शेतकरी संघटनेचा मी अभिमान बाळगतो; पण ग्रामीण साहित्याला ती दिसली नाही. एका अर्थाने शेतकरी संघटनेचा पराभव झाला आहे आणि ग्रामीण साहित्याचीही चळवळ काही फार जोरात चालू नाही. एका तऱ्हेने आपण दोघेही हरतो आहोत आणि ज्या लोकांचा आपण कडवा विरोध केला ते लोक आता मोठ्या तेजाने तळपताहेत. वेगळ्या अर्थाने सांगायचे झाले तर, जोतिबा फुल्यांचा तिसऱ्यांदा पराभव झाला आहे. जोतिबांनी स्पष्टपणे मांडलं आहे- इंग्रज इथं कायमचा राहणार आहे असं नाही, इंग्रज एक दिवस जाणारच आहे; पण हजारो वर्षे आपण जातीजातींना दास्यात ठेवलं, इंग्रजांमुळे त्यांना विद्या मिळायची शक्यता पहिल्यांदा तयार झाली आहे, ती विद्या गावागावात

अंगारमळा । १२४