पान:अंगारमळा (Angarmala).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी काही जन्माने शेतकरी नाही; पण या बाबतीत माझ्या मनात जे काही प्रश्न तयार झाले ते सांगतो. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करीत असताना वेगवेगळ्या देशांत जाण्याचा योग आला. तिसऱ्या जगातील गरिबीचा उगम शेतीत आहे हे त्यावेळी लक्षात आले माणि मग मी शेती विकत घेऊन शेतकरी बनलो. मी शेतकऱ्याच्या जातीचा नाही; किंबहुना ज्यांनी शेतकऱ्यांना पिढ्यान् पिढ्या पिळलं अशा ब्राह्मण जातीत जन्मलेला आहे. हे मुद्दाम सांगतो, अशाकरिता, की कोणी आपल्या पैतृक वारशाने शेतकऱ्यांशी निष्ठा सांगू नये. मी जेव्हा हिंदुस्थानात परत आलो, त्याच्या आधी बारा वर्षे मराठी बोलत नव्हतो; घरी मुलींबरोबरसुद्धा फ्रेंचमध्येच बोलत होतो. जन्माने शेतकरी नाही, धर्माने नाही, मराठीशीही संपर्कही नाही. एवढं असूनसुद्धा शेतकरी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या, त्या गोष्टी मला ग्रामीण साहित्यामध्ये सापडल्या नाहीत. यावर्षी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला तेव्हा सगळीकडे खळबळ उडाली; पण फारशी नाही. मंडल आयोगाचा अहवाल जेव्हा व्ही.पी. सिंगांनी मान्य केला त्यावेळी राजेंद्र गोस्वामीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पाच आत्महत्या झाल्या आणि सरकार पडलं. दिल्लीमधल्या एखाद्या गटानं आंदोलन केलं, काहींनी आत्महत्या केली तर संबंध देश खळबळून उठतो, पेटून उठतो, सरकार पाडतो आणि आज पाचशे शेतकरी मेले तर कोणी म्हणतं, "कदाचित कर्जाच्या बोजामुळे असेल किंवा इतरही काही कारणांनी हे घडलं असेल, काय भानगडी असतील आपण काय सांगावं?" असं मुख्यमंत्रीसुद्धा खुशाल सांगत फिरू शकतात.

 ग्रामीण आणि नागरी समाजातील संबंधांबाबतच्या कोड्याच्या आधीची कोडी माझ्या मनात आहेत, ती सांगतो.

 पूर्वी गावातल्या सावकारांनी, जमीनदारांनी गावातील छोट्या शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं शोषण केलं यात काहीही शंका नाही. पण हे शोषणाचं आदिकारण आहे असं धरणारांची निरीक्षणशक्ती कुठे कमी पडली नाही ना? कागलच्या ब्राह्मण वस्तीतून जातांना तिथं

राहतात ती सुखवस्तू दिसतात हे पाहतांना त्यांच्यातील सर्वच काही शेतीतून श्रीमंत झालेले नाहीत, एखादा त्यांनं स्वीकारलेल्या वकिलीच्या व्यवसायामुळे श्रीमंत झाला आहे हा मुद्दा त्यांच्या लक्षात का नाही आला? मी वीस वर्षांपूर्वी सांगायला सुरवात केली, की शेतीवर श्रीमंत होणे अशक्य आहे. शेती जर तोट्याचं साधन असेल तर शेती की जितकी मोठी तितका तोटा अधिक. शेती घेऊन लाखोंचा नफा मिळवणारे कुणी असतील तर ते अशी कोणती पिकं घेऊन तो मिळवतात त्याचा हिशेब तर सांगू द्यात? वीस

अंगारमळा । ११९