Jump to content

पान:अंकगणित.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ प्रस्तावना. रेघांचे अपूर्णांक म्हणून एक वेगळेच प्रकरण केलें आहे. आज - पर्यंत जी गणिताची पुस्तकें मराठीत झाली आहेत, त्यांत रेघांचे अपूर्णांक विषय मुळीच उल्लेख नाहीं, परंतु ह्या देशांतील सर्व प्रकारच्या व्यवहारांत रेघांचे अपूर्णांक येतात, म्हणून त्यांची माहिती ह्या पुस्तकांत करून दिली आहे. विविध परिमाणांच्या मोडणीत कोठें कोठें अपूर्णांकांची गरज लागते, ह्यासाठी ह्या पुस्तकांत अपूर्णांकांची मोडणी सांगितल्यानंतर विविध परिमाणांची मोडणी सांगितली आहे. तोंडचे हिशेब, व हिस्सेरशीचे हिशेब, ह्या प्रकरणांची व्यवहा रांत विशेष गरज लागत्ये, म्हणून त्यांविषयी थोडेसें लिहिलें आहे. हे हिशेब करतांना फारसा विचार करावा लागत नाहीं, आणि शिकणारालाहि हिशेबांची काही माहिती होते, ह्यामुळे पुढें जें. त्रिराशि प्रमाणाविषयीं सांगितलें आहे ते समजण्यास सोपें पडतें, म्हणून ते अगोदर सांगितले आहेत. तसेंच प्रमाण गणिताविषयी सांगतांना पहिल्यानें साधारण संख्यांचे संबंध दाखवून नंतर विशेष परिमाणांचे संबंध कसे कसे असतात, हे दाखविले आहे. सरकारी पेढी, सावकारी पेढी, आगीच्या गाडीचा कारखाना, सुताचा कारखाना, वगैरे अनेक पेढ्या व कारखाने आहेत, त्यांत लोक आपला पैसा भरतात, आणि त्या पैशाचें जें व्याज त्यांस मिळतें तें, व्यापाराचे किंवा कारखान्याचे भरभराटीप्रमाणे तेथील मिळालेल्ये रोख्यांच्या भावांत फेरफार झाल्या अन्वये कमजास्ती होत असतें, त्याविषयीं पुरी माहिती असावी ह्मणून ह्या जातीचे हिशेब समजण्याची व करण्याची पद्धति ह्या पुस्तकांत सांगितली आहे. घातप्रकरण, मूळप्रकरण, आणि श्रेढी, याविषयीं कामापुरतें विवेचन करून नंतर गंवडी, सुतार, रंगारी, वगैरे कारागीर लोकाच्या