Jump to content

पान:अंकगणित.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. आजपर्यंत मराठी भाषेत अंकगणिताविषयी जी पुस्तकें झालीं आहेत, त्यांहून ह्या पुस्तकाची पद्धति कांहीं निराळे तऱ्हेची आहे, ह्मणून तिजविषयीं काही सूचना करणे आवश्यक आहे. व्यवहारांत अनेक जातींचे हिशेब येतात, आणि अनेक जातींच्या परिमाणांची घडामोड करावी लागते, ती, ह्या परिमाणांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, हें समजल्याशिवाय नीट करतां येत नाहीं. ती घडामोड मुख्यत्वेकरून दोन प्रकारची आहे, वाढविणे आणि कमी करणे. ह्मणून अंकगणितातील बीज हेंच आहे की दिलेल्या परि- माणांची संख्या त्या परिमाणांच्या संबंधाने वाढविणें किंवा कमी करणें. संख्या वाढविण्याचे प्रकार तीन आहेत - एका संख्येत दुसरी संख्या मिळविणें, सांगितल्या संख्येची काही पट करणें, आणि कोणत्यही संख्येची त्या संख्येइतकी पट करणें. ह्यतिल पहिल्ये प्रकारास मिळवणी ह्मणतात, दुसन्यास गुणाकार, आणि तिसन्यास घात असें म्हणतात. ह्याच प्रकारें संख्या कमी कर ण्याचे तीन प्रकार आहेत - वजाबाकी करणें, भागाकार करणें आणि मूळ काढणे. हे साहाही प्रकार अंकगणितातील प्रत्येक हिसाबास लागतात असे नाहीं. परंतु अंकगणितांतील पडला हिसाब करण्यास झटली म्हणजे या साहाही प्रकारांची माहिती आवश्यक आहे. तथापि त्रैराशिक म्हणून जे काही प्रकारचे हिसाब आहेत त्यांस मिळवणी, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या चार प्रकारां पेक्षा अधिकांची गरज लागत नाहीं, म्हणून ते मात्र हे चार प्रकार झाल्यावर लागलेच सांगितले आहेत. दृढभाजक आणि लघुतम साधारण भाज्य यांजविषयीं पूर्वी माहिती करून देऊन नंतर अपूर्णाक मकरण दिले आहे.