Jump to content

पान:अंकगणित.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. कामाचा आकार कसा करावा, ह्याविषयीं कांहीं प्रकार ह्या पुस्तकांत सांगितले आहेत. हार्नर साहेबाची घनमूळ काढण्याची रीति फार सोपी आहे ती पद्धतवार या पुस्तकांत दाखविली आहे. शेवटीं संख्यावाचन, संख्यालेखन, व संख्यांचे दुसरे मकार, ह्यां- विषय का विशेष सांगून हा ग्रंथ पुरा केला आहे. हा ग्रंथ करतांना बहुतेक विषयांतील उदाहरणें व उपपत्ति जी दिली आहे ती, इंग्रजींत कोलेन्सो साहेबांचें जें अंकगणिताचें बूक आहे, त्यांतून घेतली आहे ; कोठें कोठें मराठी अंकगणिताचे बुका - चाही आश्रय घेतला आहे. विषय जेथचे तेथें यथाक्रमानें यावें, व व्यवहारांत ज्या ज्या हिशेबांची विशेष गरज लागते, त्या सर्वांचा समावेश ह्या पुस्तकांत असावा, असा हेतु धरून है पुस्तक तयार केलें आहे. केरो लक्ष्मण छत्रे.