Jump to content

पान:अंकगणित.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळवणी. लांब पडतो, ह्यास्तव तो संबंध दाखविण्याकरितां काही चिन्हें योजिली आहेत, त्यांस कार्यप्रकाशक चिन्हें ह्मणतात. हीं शिकणारांनी समजून घ्यावीं. + ( अधिक ). है [चिन्ह जेव्हां दोन संख्यांच्या मध्ये असतें तेव्हां त्यांची बेरीज करावयाची आहे असें समजावें, उ. ३ + ४. —(उणें). हें चिन्ह जेव्हा दोन संख्यांच्या मध्यें असतें तेव्ह डावेकडील संख्येत उजवेकडील संख्या वजा करावयाची आहे असें समजावें. उ. ४-३. X ( गुणाकार )- हॅ चिन्ह ज्या संख्यांच्या मध्यें असतें त्यांचा गुणाकार करावयाचा आहे असें समजावें. ३ x ४. + ( भागाकार ) . हैं चिन्ह जेव्हां दोन संख्यांच्या मध्यें असतें तेव्हां डावेकडील संख्येस उजवेकडील संख्येने भागावयाचे आहे असें समजावें. उ. १५ : ३. = ( बरोबरी). हे चिन्ह ज्या दोन पदांच्या मध्ये असतें तीं दोन पर्दे बरोबर आहेत असें समजावें. उ. ३ + ४ = ७. मिळवणी. एकाच जातीच्या अनेक रकमा एके ठिकाणीं कर त्यास मिळवणी, आणि मिळवणी करून जी रकम येती तीस बेरीज, असें ह्मणतात. मिळवणीच्या रकमा एकाखाली एक अशा मांड कीं एकं खालीं एकं, दहं खालीं दहं, ह्याप्रमाणें येतील. सर्व रकमा मांडल्यावर त्यांचे खाली रेघ ओढून प्रथम एकंचे अंकांची बेरीज करावी, आणि त्या बेरजेत एकं अस- तील ते रेषेखालीं मांडून दहं असतील ते हातचे ध्यावे आणि दहंचे ओळींत मिळवून त्या ओळीची बेरीज करावी; पुन्हा तींतील दह पूर्वी लिलिलेल्या एकंचे मार्गे दहचे स्थानी लिहावे आणि शतं हातचे घेऊन ते शतंच्या ओळींत