Jump to content

पान:अंकगणित.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अंकगणित. आहे. तसेंच पंधरा (१५) यांत एकावर पाच काढले आहेत व एक हा त्याच्या दसपटीबदल आहे, कां कीं एकाची दसपट दहा आणि पांच मिळून पंधरा हे एकावर पांच काढल्यानें झाले. याचप्रमाणे एका अंकावर एक मांडून त्याजवर आणखी दुसरा एक मांडला तर प्रथम मांडलेला अंक आपली शंभरपट दाखवितो, दुसरा हा आपली दसपट आणि शेवटचा आपली एकपट दाखवितो. जसें १४९ यांत प्रथम मांडलेला एक याची शंभरपट (१००) दुसऱ्यानें मांडलेला चार याची दसपट चाळीस, शेवटला मांडलेला नऊ याची एकपट नऊ मिळून एकशैं एकूणपन्नास झाले. याप्रमाणे एकावर एक एकावर एक असे अनेक अंक मांडले आणि उजवेकडून आ- रंभ करून प्रत्येक अंक काय दाखवितो, हे पाहिले तर पहिला अंक आपली एकपट दाखवितो, दुसरा दसपट तिसरा शतपट, चौथा हजारपट, पांचवा दहाहजारपट . यावरून कोणत्याही संख्येवरील उजवेकडील पहिल्या अंकास एक असे नांव दिले आहे. दुसन्यास दहं, तिसन्यास शतं याप्रमाणें नांवें दिली आहेत. त्यांच्या योगानें संख्या वाचणें किंवा लिहिणें हें फार सुगम झालें आहे. आपल्या मराठी रीतीने संख्येतील अंकस्थानांस अठरा पर्यंत नांवे आहेत, पढें नाहींत, तथापि अठरा अंकस्थानांपर्यंत संख्या चिनचूक वाचतां लिहितां आली म्हणजे आणखी कि तीही अंकस्थानांची संख्या लिहिण्यास किंवा वाचण्यास विशेष अडचण पडेल असें नाहीं. या अंकस्थानांचीं नांवें हीं आहेत.