पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बेचाळीसचे गौडबंगाल


 न्नास वर्षांनी पितृत्व मान्य
 ऑगस्ट १९४२ च्या आंदोलनाचा सुवर्णजयंती महोत्सव आता पार पडला आहे. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन जेथे भरले होते त्याच गोवालिया टँक मैदानावर मोठा वैभवशाली समारंभ झाला. त्याच दिवशी दिल्लीच्या इंडिया गेटजवळची एक मोठी जागा ऑगस्ट क्रांती मैदान या नावाने जाहीर करण्यात आली. नंतरच्या वर्षभरात देशातील प्रत्येक राज्यात १९४२ साली जेथे जेथे काही उठाव झाले होते तेथे तेथे खुद्द पंतप्रधान जाऊन आले. जागोजाग उत्सव साजरे झाले.
 महाराष्ट्रात दोन उत्सवांना पंतप्रधान स्वतः हजर राहिले. १९४२ च्या आंदोलनात सातारा जिल्ह्यात (त्यावेळच्या सातारा जिल्ह्यात आजच्या सांगलीचाही समावेश होता.) ग्रामराज्य स्थापन झाले होते. १९४२ च्या सगळ्या आंदोलनात नाना पाटलांच्या प्रति (कां पत्री?) सरकारचे स्थान फार मोठे आहे. सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या समारंभात खुद्द पंतप्रधान उपस्थित राहिले.

 वर्धा जिल्ह्यातील आष्टीचिमूर प्रकरण हादेखील आंदोलनातील एक मोठा ज्वलंत अध्याय. आष्टीतील गावकऱ्यांनी मिरवणूक काढली; तेथील फौजदाराने मिरवणुकीवर गोळीबार केला; प्रकरण इतके तापले की त्या फौजदाराला गुपचूप आष्टीवरून हलवून चिमूरला पाठवण्यात आले. हे समजताच संत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेचे चिमूर येथील पोलिस चौकीवर हल्ला झाला; चौकी जाळली गेली; या प्रकरणी १०-१२ लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सुदैवाने, अंमलबजावणीच्या आधी स्वातंत्र्य आले, फाशीच्या शिक्षा रद्द झाल्या. या सगळ्या रोमहर्षक इतिहासाला वंदन करण्यासाठी स्वतः पंतप्रधान

भारतासाठी । ९४