पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/203

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेआपल्या उत्क्रांत इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या साहाय्यानेमाणूस जितकी प्रगती करतो तितका तो अमूर्त कल्पना आणि आदर्श यांच्या कचाट्यातून सुटत जातो. चांगले रहावे, अधिक शिकावे इंद्रियांची व्यापकता वाढवावी या इच्छा आणि भका त्यांची पूर्तता केल्याने वाढत जातात; त्यांची गाडी लागावी लागते. आहार, निद्रा भय आणि मैथुन यांची आवड पुरवावी तशी वाढते. तसेच, स्वातंत्र्याच्या कक्षांची तहानही जितकी भागवावी तितकी वाढते. गरीब विकसित देश वाढत्या स्वातंत्र्याच्या चक्रात स्वतःला लोटून देतात.

 मुंबईला गिरण्या सुरू झाल्या त्याकाळी बहुसंख्य मजूर कोकणातून, देशावरून आलेले असते; शेतीवर जगता न आल्यामुळे मुंबईला निर्वासित होऊन आलेले; गिरणीत नोकरी करून दोन पैसे जमले की, आपण आपल्या शेतीवर परत जायचे आहे असा ध्यास मनाशी बाळगणारे; निदानपक्षी, आपण नोकरी करीत राहवे आणि शेतिीवरल्या माणसांकडे मनी ऑर्डर पाठवून शेती चालत ठेवावी आणि गौरी, गणपती, दिवाळी, आंब्यांचा मोसम - जितके दिवस गावाकडे काढता येतील तितके काढावे अशा बद्धीचे मंबईत कोणत्यातरी पत्र्याच्या किंवा सिमेंटच्या चाळीत पाठीला पाठ लावून झोपण्यापुरती जागा असती की, पुरे झाले. तेथे बऱ्यापैकी बस्तान बसावावे, कुटुंबाला आणावे, सुखाने जगावे असा स्वार्थी विचार त्यांच्या मनाला शिवतही नसे. बोनस किंवा इतर वरकड कमाई झाली तर त्याचा उपयोग मुंबईतील जगणे सुधारण्यासाठी कधी व्हायचा नाही. बिडीचे एखादे किंवा क्वचितप्रसंगी थोडी बाटली यापलीकडे चैनशौक म्हणून नाही. ज्यादा पैसे हाती आले की 'वाल्या' मंडळी बोट भरून कोकणात रवाना. कामगारी अभावी गिरण्या बंद ठेवायची वेळ येई. काळ गेला. नवनवीन पिढ्या मुंबईत काम करू लागल्या. त्यांची गावाशी आतड्याची गुंतवणूक कमी कमी होत गेली. कुटुंबे मुंबईत स्थायिक होऊ लागले तेव्हा कोठे मुंबईकर कामगारांची जीवनमान सुधारण्याची धडपड सुरू झाली. जुन्या गावातील रहिवाशांच्या वसाहती सलगपणे मुंबईत उभ्या राहिल्या आहेत. अमुक झोपडपट्टीतला अमुक कोपरा म्हणजे रत्नांग्रीच्या खानवली जवळील आडिवरे ग्रामस्थांचा! तेवढ्या कोपऱ्यात गावचा गणपती वेगळा होणार, भजनीमंडळ वेगळे होणार, अजूनही गाव हे महत्त्वाचे एकक आहे; पण सगहेच गाचकरी समोर असल्यामुळे जरा चांगले रहावे याची गोडीही वाढत आहे. अर्थकारण हे त्यांच्या जीवनाचे सूत्र अजून झालेले नाही. रोजगार मिळेनासा झाला की विकासाच्या आर्थिक वाटा समजून घेण्याचे त्यांच्या मनातही येत नाही. जगण्याची शैली

भारतासाठी । २०३