पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामूहिक, टीळीची; त्यामुळे, कोणत्याही अडचणीच्या दोषाचे खापर दुसऱ्या एखाद्या जनसमूहावर फोडण्याची प्रवृती, त्यांचा राग कधी मद्राशांवर, कधी गुजराथ्यांवर, कधी मुसलमानावर फिरवणारे नेते मिळाले की प्राणपणाने झुंजायला ही मंडळी तयार.
 याउलट, अमेरिकेसारख्या संपन्न देशात अगदी श्रीमंत बापाची लाडकी लेक हातखर्चासाठी भरपूर पैसे मिळत असले तरीदेखील फावल्या वेळात अगदी हॉटेलात कपबशा धुण्याचेदेखील काम करून चार पैसे वर मिळविण्यात कमीपणा मानीत नाही. चांगले जगणे आणि स्वातंत्र्य उपभोगणे यांची गोडी लागत नाही ते जगतात. 'आहारनिद्राभयमैथुना'च्या क्रात, उच्च उच्च परमार्थाच्या कल्पना बाळगीत आणि झुंजीसाठी सोडलेल्या कोंबड्या आणि टकरीसाठी सोडलेल्या रेड्याबैलांप्रमाणे मरण येईपर्यंत झुंजत. निरर्थक झुंजत राहणे हा जनावरांचा गुण आहे. आपण कशाकरता लढतो आहोत असा विवेक करून झुंजीतील प्राणी झगडायचे थांबून झुंज पहायला जमलेल्या गर्दीकडे कुतुहलाने पाहत बसले आहेत असे झाल्याचे काही कधी ऐकिवात नाही.

 संपन्न आणि विपन्न देशातील लोकांच्या मनोधारणांत फरक असण्याचे एक कारण त्यांच्या खाण्यापिण्यातील फरक, हेही असू शकते. युरोप खंडात सर्वत्र कडव्या कॅथॉलिक पोपची अधिसत्ता शतकानुशतके चालत होती. मार्टिन ल्यूथरने प्रोटेस्टंट धर्माची स्थापना केली. परमेश्वर मानणाऱ्या पण पोपची मध्यस्थी नाकारण्याच्या अधिक खुल्या दृष्टीकोनाच्या प्रोटेस्टंट बंडाचा प्रसार झपाट्याने युरोपभर झाला. अतिथंडीचे स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी, बेल्जियम - सारे प्रोटेस्टंट बनले. इंग्लंडध्ये राजालाच श्रेष्ठ धर्मगुरु मानणारा पंथ निघाला. गंमत अशी की, स्पेन, आयर्लंड, दक्षिण फ्रान्स, इटली या देशात मात्र पोपच्या अधिसत्तेला धक्का लागला नाही. हे दक्षिणेकडील सारे प्रदेश अधिक उष्ण हवामानाचे. मुख्य व्यवसाय शेतीचा, राहणीमान निकृष्ट. वर्षातील अनेक महिने मुख्य अन्न बटाटे म्हणजेच पिष्टमय पदार्थ, आहारात प्रथिनांचे प्राधान्य असलेल्या उत्तर युरोपात ज्ञानकर्ममार्ग फोफावला आणि दक्षिणेत मात्र पोपवार श्रद्धा बाळगणाऱ्यांची चलती राहिली. निकृष्ट असंतुलित आहारामुळे माणसाची जिद्द कमी होते, तो अधिकाधिक श्रद्धाळू बनतो याचा अनुभ्ज्ञव आपल्याकडेही आहे. उपासतापास केल्याने सात्विकता वाढते. धर्मप्रवृत्ती वाढते असे आपण मानतोच. बालविधवांचे पाऊल वाकडे पडू नये यासाठी त्यांनादेखील निकृष्ट, निकस आहारावर जगविण्याची ब्राह्मण कुटुंबात पद्धत होतीच. जीवनाविषयी सकारात्मक

भारतासाठी । २०४