पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/202

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेफूटपट्टी असली म्हणजे आक्रस्ताळीपणाचे निर्णय नाहीत.
 पारमार्थिकांचे, धर्मवाद्यांचे, समाजवाद्यांचे किंवा इतर साऱ्या 'निःस्वार्थ' जीवन आदर्शाच्या लोकांची परिस्थिती वेगळी असते. कोणाला साक्षात जगन्नियंत्या परमेश्वराकडूनच 'कुणी कसे चालावे, कुणी कसे बोलावे. यासंबंधी आदेश मिळालेले असतात. कोणाला एखाद्या सारग्रंथाने, कुराणाने, बायबलने झपाटलेले असते. आपलं जीवन हा काही वैश्विक सत्तेच्या किंवा इतिहासाच्या हेतूपूर्ततेकरिता आहे; आपली म्हणून काही तत्त्वे आहे आणि त्या तत्त्वांबाबत तरडजोड पैशाच्या राशी ओतल्या तरी होणार नाही असा काहीसा त्यांचा विचार असतो. ईश्वरी आदेशाचे मोल काय? मार्क्सच्या उकतीची किमत काय? आकडेवारी जमत नसली की, अशा तत्त्वांसाठी लोक बेहिशेबी लढाया करण्यास तयार होतात. 'शिर कटेल, पण वाकणार नाही.' अशी 'सरफरोशी की तमन्ना' अंगअंगातून सळसळू लागते. अल्लाचे नाव घ्यावे आणि खुशाल खंड खंड लूटमार, जाळपोळ, कत्तली, बलात्कार करावे आणि यामागे अल्लाचाच आदेश आहे असे मानावे हे इतिहासात वारंवार घडले आहे. बौद्धांनी केले आहे. ख्रिश्चन.मसलमान.समाजवादी या साऱ्यांनीच एका हातात आपापले 'कुराण' आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन राक्षसी विद्ध्वंस केले आहेत. स्वार्थभावनेचा कोणी कितीही उपहास करो. निदा करो; कोणाही स्वार्थी माणसाने आपल्या स्थार्थासाठी धार्मिक आणि समाजवादी यांच्या तुलनेने सहस्त्रांशही विद्ध्वंस केलेला नाही.
 संपन्न देश आणि संपन्न लोक आकाशाला गवसणी घालणाऱ्या वावदूक तत्त्वज्ञानाला आटोक्यात ठेवतात, चर्चमध्ये जातात, अनुभवाची ती छटा महत्त्वाचीही मानतात; पण 'देवाचे नाणे देवाला, राजाचे राजाला' असा विवेकही करतात. निर्णय घेण्यासाठी काही निश्चित फूटपट्टी ठरली की, निर्णय घेणे सोपे होते. हिशेबाने होते; प्रलयंकारी होत नाही, प्रत्यक्ष परिणाम पाहू गेले तर ईश्वर, परमार्थ आणि करुणा यांचा जप करणारांनीच महापातके केली आणि आपल्या संसारासाठी धडपड करण्याऱ्यांनी परमोच्च नैतिकता दाखवीली असे म्हणावे लागेल. मग, ही सांसारिक नैतिकता गरीब समाजात अभावानेच का आढळावी? खरे म्हटले तर, गरीबांनाच जीवनमान उंचावण्याची, शिकण्याची, औषधपाण्याची गरज असते. व्यवहारी हिशेबांपणा त्यांना अधिक सहजपणे सुचला पाहिजे; पण असे होत नाही.

 बेहिशेबी परमार्थ हे प्रगतीचे लक्षण नाही. माकडातून नुकत्याच उत्क्रांत झालेल्या मानवप्राण्याच्या अवस्थेशी सुसंगत असलेली ती मनोधारणा आहे.

भारतासाठी । २०२