पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आशेचा किरण दिसत नाही. एका काळचे दिग्गज नेते तुरंगाकडे खेचून गेले जात आहेत यातच लोकांना काही उत्साह वाटतो आहे. त्यांच्या जागी नवीन येणारेही तुरंगात जाण्याचाच पात्रतेचे आहे याचा लोकांना, तात्पुरता का होईना, विसर पडत आहे.
 स्वातंत्र्यदिनाचा सुवर्णमहोत्सव हा काही निर्भेळ आनंदाचा आणि अभिमानाचा असणार नाही हे उघड आहे. खुद्द चालू पंतप्रधानांनी समारोहाची कल्पना स्पष्ट केली आहे. १५ ऑगस्ट १९९७ ते १५ ऑगस्ट १९९८ हा कार्यक्रम चालेल. समारंभ राष्ट्रीय पातळीवर होतील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होतील; सरकारी प्रेरणेने होतील तसेच खाजगी प्रेरणेने होतील आणि सगळ्या कार्यक्रमांत उत्सवाचा भाग असेल त्याचप्रमाणे आत्मनिरीक्षणाचाही भाग असेल असे खुद्द पंतप्रधानांनी म्हटले आहे.
 पण उत्सवाची टक्केवारी किती आणि गांभीर्याने आत्मनिरीक्षण करण्याची टक्केवारी किती असा प्रश्न कोणी विचारला तर उत्सावाचे फारसे प्रयोजन दिसतच नाही.
 पण, आम्ही उत्सवप्रिय लोक आहोत. १५ ऑगस्ट १९४७ पासून वर्षभर उत्सव होणार, समारंभ होणार, भाषणे होणार; वर्षभरतरी सरकारी दूरदर्शनचे तोंड पाहू नये अशी परिस्थिती होणार.
 आत्मनिरीक्षण सार्वजनिक समारंभात होऊच शकत नाही. काही भाबडी मंडळी स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने काही विकासाचे कार्यक्रम पार पाडावेत अशा सूचना करतील. आग्रह धरतील. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत सध्या आपल्याच देशात चालू आहे ती बंद करावी, किमान प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे, पूर्ण साक्षरता आणावी, लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी काही धडक कार्यक्रम घ्यावा अशासारख्या सूचना मोठ्या निरागसपणे केल्या जातील. ५० वर्षांच्या काळात जे घडले नाही ते या वर्षांत पुरे जोऊ शकेल अशी आशा बाळगणे म्हणजे ५० वर्षांच्या पराभवाची कारणमीमांसा माहीत नसल्याचे निदर्शक आहे.

 स्वातंत्र्यदिनाचा हा सुवर्णमहोत्सव सुरू होईल. त्या १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत, कदाचित, दोनचार पंतप्रधान रंगमंचावर येतील आणि निघून जातील! महोत्सवाच्या काळात सत्ता स्थिर राहाण्याची शक्यता फारशी नाही तरीही महोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे. अशा उत्सवांनी, दररोज भेडसावणाऱ्या समस्या, टोचणारी दुःखे थोडी विसरायला होतात हे खरे, पण तरीही एक प्रश्न

भारतासाठी । १५६