पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/155

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेनाहीत अशा घोषणा द्याव्या लागतात.
 पहिल्या स्वातंत्र्यदिनानंतर ५० वर्षे उलटली; स्वातंत्र्यदिन उत्साहाने कोणी साजरा केला आहे असे ऐकिवात नाही. राज्य सरकारी झाले, तसाच स्वातंत्र्यदिनही सरकारी झाला. स्वातंत्र्यदिनी हक्काची सुट्टी मिळते एवढाच काय तो सार्वजनिक आनंदाचा भाग!
 स्वातंत्र्यदिन साजरा करण्यातला उल्हास का मावळला? नवेपणाचा उत्साह टिकून राहाणे कठीण असते हे खरे; पण वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचा उत्साह दिवाळीचा उत्साह वाढतच चालला आहे. गणपती, नवरात्र, दांडिया असे नवेजुने उत्सव दरवर्षी वाढत्या जल्लोशात साजरे होत आहेत. मग, स्वातंत्र्यदिनावरच अशी अवकळा का आली?
 कारणे अनेक असतील; पण त्यातील एक आणि अत्यंत महत्त्वाचे कारण स्वातंत्र्याने जनसामान्यांची केलेली महत्त्वाचे कारण स्वातंत्र्याने जनसामान्यांची केलेली निराशा हे आहे. स्वातंत्र्य आले; पण देश अधिक बलवान झाला नाही. स्वातंत्र्य आले; पण देशाची इभ्रत, वाढणे सोडाच, पार धुळीस मिळाली. इंग्रज गेले, वसाहतीवादी लूट गेली पण देशाची अर्थकारणातील घसरगुंडी थांबली नाही. महागाई, बेकारी, गरीबी भ्रष्टाचार गुंडगिरी थैमान घालीत आहेत. थोडक्यात, स्वातंत्र्यानंतर गांधीजींचे स्वप्न साकारले नाही. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले तेव्हा चर्चिल साहेबांनी एक अभद्र भाकित केले होते. 'हिंदुस्थानचे सारे राजकीय नेतृत्व कचखाऊ, कमअस्सल आहे. हिंदुस्थानातील दरिद्री जनतेला त्यांच्या हाती सोपविणे क्ररपणाचे होईल.' असे चर्चिलने सांगितले होते. ५० वर्षांच्या स्वातंत्र्यात काय झाले याचा एका वाक्यात सारांश द्यायचा झाला तर 'चर्चिलचे भाकित खरे ठरले' हे वाक्य पुरेसे आहे असे कोणतीही प्रामाणिक माणूस कबूल करील.
 गाधीजींनी स्वराज्याचे आंदोलन केले ते अशा स्वराज्यासाठी की जेथे माणूस महत्त्वाचा असेल, सरकारी नाही; जेथे गाव स्वयंपूर्ण असेल आणि सर्व व्यवस्थेच्या मध्यभागी असेल; जेथे महत्त्व शेतीचे आणि ग्रामोद्योगाचे असेल, कारखानदारीचे नाही.

 स्वातंत्र्य मिळाले आणि शहरांचे व कारखान्यांचे महत्त्व मानणारी समाजवादी व्यवस्था देशात आली. सर्व सत्ता शासनाच्या हाती एकवटीला. स्वातंत्र्यानंतरची सुरुवातच राष्ट्रपित्याच्या द्रोहाने झाली. समाजवादाचा कैफ आज उतरला आहे; पण समाजवादाची लत अजून सुटलेली नाही. नजिकच्या भविष्यकाळात कोठे

भारतासाठी । १५५