पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/100

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेत्यात आक्षेपार्ह काही नाही. कारण या पत्रकात चळवळ अहिंसावादी आहे आणि गांधींनी आदेश दिल्याखेरीज कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करायची नाही असे स्पष्ट म्हटले आहे."
 इ. स. १९४२ च्या क्रांतीचे नेते आता जीवित नाहीत किंवा कार्यशाली नाहीत, ४४-४५ सालच्या सुमारास भारतातील तरुणांवर जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांचा मोठा प्रभाव होता. युद्ध संपले, स्वातंत्र्यदानाची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य लवकर आले नाही तर अहिंसावादी स्वराज्य आंदोलन संपले आणि ४२च्या जहालांच्या हाती तिचे नेतृत्व जाईल अशी धास्ती नेहरू-पटेलांनासुद्धा पडली होती. घाईत त्यांनी फाळणीदेखील कबूल करून टाकली. त्याचे एक कारण ४२ च्या क्रांतिकारकांबद्दलची काँग्रेस नेतृत्वाची धास्ती, हे उघड आहे.
 काळाचा महिमा असा की, काँग्रेसच्याच पंतप्रधानांना एका काळी काँग्रेसनेच नाकारलेले पितृत्व स्वीकारावे लागले.

(२१ नोव्हेंबर १९९३)

♦♦

भारतासाठी । १००