Jump to content

पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६. स्वयंसहाय्य गटाचे वार्षिक नियोजन

 एखादी कार्यशाळा घेऊन हे पुस्तक गटाचे वार्षिक नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

 यामध्ये नियोजन म्हणजे काय? नियोजनाचे महत्त्व, गरज, वार्षिक नियोजन करण्याची पद्धत याचा विचार मांडला आहे. गटासोबतच गरजांवर आधारित नियोजनाचे महत्त्व व फायदा दिलेला आहे.

 या पुस्तकामध्ये प्रेरकांसाठी सूचना आहेत, स्वयंसहाय्य गटाचे वार्षिक नियोजन, अंदाजपत्र तयार करणे, वार्षिक नियोजनासाठी महत्त्वाचे निकष आणि त्याचे मूल्यमापन दिलेले आहे

 ७. स्वयंसहाय्य गटांचा संघ अंतर्गत व बाह्य लेखा परीक्षण

 या पुस्तिकेमध्ये स्वयंसहाय्य गटाच्या लेखापरीक्षणाची गरज, बाह्य लेखा परीक्षकाची भूमिका, अंतर्गत लेखा परीक्षण, अंतर्गत लेखा परीक्षकाची पात्रता हे मुद्दे समाविष्ट केले आहेत.

 तसेच अंतर्गत लेखा परीक्षाकाचे कार्य, अंतर्गत लेखा परीक्षण प्रक्रिया आणि अंतर्गत हिशोब तपासणी अहवाल, बाह्य लेखा परीक्षणाचा अर्थ, बाह्य परीक्षकाची भूमिका, लेखा परीक्षकाची जबाबदारी, लेखा परीक्षणासाठीची तयारी, इ. बाबत माहिती दिलेली आहे.

 ९. कामगिरी निकषांप्रमाणे स्वयंसहाय्य संघाचे वार्षिक नियोजन

 ह्या पुस्तिकेमध्ये स्वयंसहाय्य संघाचे वार्षिक नियोजन, स्वयंपूर्णतेच्या दिशेने प्रवास सुकर, सहज आणि वेगवान होईल ह्यासाठी कामगिरी निकष दिलेले आहेत. तसेच अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रियापण दिलेली आहे. ह्या पुस्तिकेच्या आधारे कार्यशाळा घेऊन संघाचे नियोजन करता येईल.

 १०. स्वयंसहाय्य गट आणि संघातील निवडणूक पद्धती

 या पुस्तिकेमध्ये निवडणूकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वयंसहाय्य गटातील निवडणूक, स्वयंसहाय्य गटामध्ये प्रतिनिधी निवडण्याची गरज, प्रतिनिधीचा कार्यकाळ,

४८
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन