Jump to content

पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  २. कर्जाचे महत्त्व

 उत्पन्न प्राप्तीसाठी, मिळकतीसाठी कर्ज, उन्नतीसाठी कर्ज, निधीचे स्त्रोत, व्याजाची आखणी, परतफेड, कर्जाचे धोके कमी करणे आणि निष्कर्ष हे मुद्दे या संदर्भात महत्त्वाचे आहेत. पैसे जबाबदारीने घेतल्यास ते नक्कीच उपयोगास येऊ शकतात. आपली परतफेड करण्याची जेवढी क्षमता आहे त्याच प्रमाणावर कर्ज घेतले पाहिजे.

 ३. स्वयंसहाय्य गटाचे पुस्तक पालन

 ही पुस्तिका मराठीत करण्यात आली नाही. कारण ती माहिती अगोदर प्रसिध्द केली होती.

 ४. स्वयंसहाय्य गटाच्या खात्याची पुनर्बाधणी

 गटाचं लेखापरीक्षण करताना गटाच्या पुस्तकांत कमतरता आहे असे लक्षात आल्यावर ते पूर्ण कसे करावे ह्याचे मार्गदर्शन या पुस्तिकेत आहे. गटाची विविध पुस्तके व नोंदी याची यादी आहे. सभासदांचे बचत तक्ते तयार करणे, कर्ज देणाऱ्या संस्थांच्या नोंदी लक्षात घेणे, बँक कर्ज पासबुक, फिरत्या भांडवलाची नोंद ठेवणे किंवा माहिती मिळवणे, सभासद माहिती फेरपडताळणी करणे, रोख शिल्लक व बँकेतील शिल्लक यांची नोंद घेणे, भागभांडवल बचतीची माहिती घेणे, संघात असलेल्या गटांचे ताळेबंदपत्रक तयार करणे, शेवटच्या महिन्याचे उत्पन्न-खर्च पत्रक तयार करणे, मागील महिन्याचे जमाखर्च पत्रक तयार करणे. ह्या सबंधीची माहिती पुस्तिकेत आहे. त्यानिमित्ताने गटाच्या सभासदांना चांगल्या नोंदी ठेवण्याची जाणीव निर्माण करून देण्याचीही एक संधी असते. तसेच प्रत्येक व्यवहार हा गटाच्या सभेतच व्हायला पाहिजे.

 ५. स्वयंसहाय्य समूह बाह्य लेखापरीक्षण (ऑडीट)

 या पुस्तिकेत हिशोब तपासनीसाची गरज काय आहे, तिची नियुक्ती कशी करावी, तिची योग्यता, हिशोब तपासणीचे काम आणि हिशोब तपासणीचा अहवाल हे प्रमुख मुद्दे दिलेले आहेत. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. देशभरात गटांचे ऑडीट झाले पाहिजे. ह्याचा आग्रह ठेवण्याची गरज आहे.

 गाव पातळीवर सी.ए.ने ऑडिट करावे अशी गरज नाही तर सी.ए.च्या मार्गदर्शनाखाली ऑडिट जाणकारांची फळी तयार होऊ शकते.

४७
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन