पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिनिधींचे गुण, निवडणुकीची प्रक्रिया विभाग / ग्राम संघ पातळीवर प्रतिनिधी निवडण्याची गरज, (प्रतिनिधीचा कालावधी,) त्यांचे गुण आणि निवडणुकीची प्रक्रिया मांडलेली आहे,

 ११. उत्तम कामगिरीचा पुरस्कार

 गावातील गट, विभाग, संघ पातळीवर काम करण्यासाठी काही मापदंड ठरविणे आणि त्याप्रमाणे सदस्यांनी आदर्श पद्धतीने काम करण्यासाठी हे पुस्तक आहे.

 त्याची पद्धत अशी की गावांमध्ये चांगले काम करणाऱ्या गटांना, तालुक्यामध्ये चांगले काम करणारे विभाग, तसेच जिल्ह्यामध्ये चांगले काम करणाऱ्या संघांना पारितोषिक देणे त्यासाठी या पुस्तकामध्ये निवड प्रक्रिया आणि पारितोषिके याविषयी माहिती दिलेली आहे.

 १२. आर्थिक पत्रकांची समज

 कोणत्याही संस्थेच्या आर्थिक विवरणपत्रांतून आपल्याला त्या संस्थेची माहिती कळते. हे आर्थिक विवरणपत्र अर्थ समजून घेण्यासाठी, विशेषतः आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियमितपणे नजरेखालून घालत राहिले तर आपल्याला संघाची खरी आर्थिक स्थिती समजणे शक्य होईल. त्यामुळे ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला कृती करणे शक्य होईल. आपलीही स्थिती अधिक चांगली बनवण्यासाठी आपण नियोजन करू शकतो. या पुस्तकात निधी आणि व्यवहार, ठेवी, व्यापार लेखा पालन, आय आणि खर्च विवरण पत्र ताळेबंदची ओळख आणि प्रश्नोत्तराची स्पर्धा या पुस्तिकेत दिली आहे.

 १३. स्वयंसहाय्य गट पातळीवर नफ्याचे व्यवस्थापन

 या पुस्तिकेमध्ये स्वयंसहाय्य समूहामध्ये नफा टिकवण्याची गरज, समूहांमध्ये नफ्याची वाटणी केव्हा करावी, लेखा पुस्तकातील नोंदी, एकूण बचत आणि व्याज, एकूण बचत आणि व्याज काढून घेणे या संबंधी नोंदी आहेत. सभासदांच्या भवितव्याच्या सुरक्षित उभारणीसाठी ही फार महत्त्वाची पुस्तिका आहे.

४९
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन