पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिशिष्ट १ - स्वनियंत्रण पुस्तिका मालिका

 शशीताईंनी योगदान दिलेली स्वनियंत्रण पुस्तिका मालिका अत्यंत महत्त्वाची असून आपण त्या पुस्तिकांमधल्या अनुभवसिध्द माहितीचा उपयोग वारंवार आपल्या कामामध्ये केला पाहिजे.

 शशीताईंचे योगदान असलेल्या स्वयंसहाय गट आणि त्यांच्या संघामध्ये लवकरात लवकर आत्मनिर्भर आणि शाश्वत होण्याची क्षमता आहे असे दिसून आले आहे. त्यांनी स्वतःची क्षमतावृद्धी करणे, कामकाज पद्धतीत सुधारणा करणे, उत्तरदायित्वामध्ये वाढ तसेच सभासदांच्या फायद्यासाठी आर्थिक, मानसिक तसेच भौतिक संसाधनाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी गट, विभाग, संघ पातळीवर कुशल आणि प्रभावी सभासदत्व नियंत्रण प्रणाली असणे गरजेचे आहे.

 संघांनी त्या संदर्भातील गरजा पूर्ण करण्यासाठी आधीपासूनच काही प्रणाली विकसित केलेल्या आहेत. तरीदेखील प्रभावी आणि सुव्यवस्थित नियंत्रण होऊ शकते यासाठी आंध्र प्रदेश महिला अभिवृद्धी संघमने (एपीमास)पुढाकार घेऊन स्वनियंत्रण या विषयावर एक कार्यक्रमाची आखणी केली. या अंतर्गत संघांनी गट आणि संघामध्ये पदाधिकारी सभासदांची स्वनियंत्रण क्षमता वाढ वाढविणे, पुस्तकपालन तसेच देखरेखीवर भर देण्यात आला. त्यासाठी विविध प्रशिक्षण हस्तपुस्तिका तयार करण्यात आल्या.

 या सर्व पुस्तिका तयार करण्यामध्ये स्वर्गीय शशीताई राजगोपालन यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या पुस्तिकांमधील आशयाचे तपशील पुढीलप्रमाणे

  १. बचतीचे महत्व

 बचत गट चळवळीचा फायदा काय आहे ? कुठे आहे ? बचत का केली पाहिजे, कुठे केली पाहिजे ? किती केली पाहिजे ? तसेच सामुदायिक बचतीचे महत्त्व, त्याची सुरक्षितता, त्याचा गावावर होणारा परिणाम याबद्दल या पुस्तिकेत आपल्याला वाचायला मिळते.

 आपण केलेली बचत आपला वर्तमान व भविष्यकाळ उज्ज्वल बनवेल. आपण केलेल्या बचतीत थोडी थोडी वाढ करून त्यातूनच, आपल्या कुटुंबाचा विकास कसा होईल हे ह्या पुस्तिकेत दाखवले आहे.

४६
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन