Jump to content

परिपूर्ती/एक प्रयोग

विकिस्रोत कडून

१५
एक प्रयोग

 जंतुशास्त्राची ती एक प्रयोगशाळा होती.
निरनिराळ्या जंतूंचे उत्पादन व वाढ कशी व किती
होते ह्याचे प्रयोग तेथे चालले होते. काचेच्या
लहानसहान तबकड्यांतून साखरेचे पाणी, मांसाचा
अर्क, पिठाची कांजी असे निरनिराळे पदार्थ ठेवून
त्यांत सूक्ष्म जंतू घालून काही विशिष्ट उष्णता
असलेल्या जागी ठेवीत. ज्या ज्या जंतुप्रकाराला जे
जे उष्णतामान सर्वांत मानवे तेथे त्यांना ठेवले होते.
जे जे अन्न सर्वांत जास्त मानवे ते ते दिले जाई व
मग अशा परिस्थितीत जंतूंत वाढ किती झपाट्याने
होते त्याचा अभ्यास होई. अन्नरसात ठेवलेला
एखादाच जीव खाऊन खाऊन लठ्ठ होई. त्याच्या
एकपेशीमय शरीराचे दोन तुकडे होऊन दोन नव्या
पेशी- दोन नवे जीव- उत्पन्न होत. काही क्षण
जातात न जातात तो दोहोंचे चार, चारांचे आठ
होत. सूक्ष्मदर्शकातून पाहत बसले म्हणजे
युगक्षयानंतर प्रलयवृद्ध समुद्रावर एकट्या
तरंगणाऱ्या विष्णूप्रमाणे तबकडीतील अफाट
पसरलेल्या क्षीरोदधीवर सुरुवातीला एकच सूक्ष्म
जीव पोहत असतो. तास-दोन तासांत जीवनिर्मिती

इतकी झपाट्याने झालेली असते की, पोहणाऱ्या
११६ / परिपूर्ती
 

जीवांच्या अनंत तोंडांनी शोषण होऊन क्षीरोदधी कोरडा पडण्याची वेळ आलेली असते. एकावर एक जिवांचे थरचे थर रचल्यासारखे झाले आहेत, खालचे जीव हालचाल न करता आल्याने गुदमरून जातात, तर वरच्यांचे अंग कोरडे पडून ते सुकून जातात. अशी परिस्थिती काही वेळ राहू दिली तर तबकडी पार कोरडी पडून सर्व जीव मरून जातील. पण प्रयोगशाळेतील विद्यार्थी अर्धा चमचा गोड पाणी किंवा अन्नरस तबकडीत टाकतो. शेवटच्या काही मिनिटांतील भयानक जीवनकलहातून जिवंत राहिलेले चार-दोन जीव हालचाल करू लागतात; स्वबांधवांच्या मढ्यांनी अधिकच पोषक बनलेल्या नव्या जीवनरसाचे शोषण करतात; युगचक्राला व निर्मितीला परत जोमाने सुरुवात होते. जोपर्यंत सर्वांना पुरेसे अन्न मिळते, तोपर्यंत संख्येची वाढ झपाट्याने यंत्रासारखी चालते; पण अन्नरस कमी व जीव जास्त अशी स्थिती झाली की, निरनिराळ्या तबकड्यांतील जीवांची हालचाल पाहण्यासारखी असते. पहिल्याने एकमेकांना ढकलण्याची धडपड सुरू होते- त्यात बरेच मरून तबकडीत पुरेशी जागा झाली की थोडा वेळ परत शांततेने प्रजनन चालू होते, पण त्यातही पूर्वीचा सुरळीतपणा दिसून येत नाही. विशेषतः तबकड्यातील सूक्ष्म जीव बहुपेशीमय असले तर बदललेल्या परिस्थितीचा परिणाम त्याच्यावर चटकन दिसून येतो. काही साश्य कारण नसता एकदम सर्व जंतू सैरावरा पळू लागतात, एकमेकांवर आदळतात, चिरडतात व मरतात. जणू तबकड्यातील सर्व जीवांना भुताटकीने झपाटलेले आहे अशा त्यांच्या हालचाली असतात. कधीकधी सर्व जीव काही हालचाली न करता मतमय स्थितीत पसरलेले दिसतात. त्यांचे जीवन घड्याळासारखे सुरळीत न चालता त्यात काहीतरी उलथापालथ होतेसे पाहणाराला वाटते. प्रयोगशाळेत काही तबकड्यातून दर तासाने जीव काढून दुसऱ्या तबकड्यात ठेवतात व नवा अन्नरस देतात.अशा जीवांची संख्या वाढतच असते. हवा, योग्य उष्णता व भरपूर अन्न यांचा त्यांना पुरवठा असतो. बाहेरचे शत्रू नाहीसे झालेले असतात. अंत:कलाहाची परिस्थिती येण्याच्या आतच नवे अन्न व नव्या तबकड्या वसाहतीसाठी मिळत जातात व सारखी न थांबता जीवांची संख्या वाढत जाते. मरण जणू आपले कार्य विसरून गेलेले असते. ह्या कृत्रिम सृष्टीत जननाचीच काय ती परवानगी असते.
 "अशा प्रकारचे हे जीव वाढायला लागले तर थोड्या महिन्यात

व्यापून टाकतील!" एक विद्यार्थी सूक्ष्मदर्शकातून पाहता पाहता उदगारला.
परिपूर्ती / ११७
 

शिकवणारे अध्यापक जणू ह्याच संधीची वाट पहात होते. ते म्हणाले, “अगदी बरोबर; पण सृष्टीमध्ये जीवांच्या वाढीला काही सर्व गोष्टी अनुकूल नसतात. ज्या डबक्यातून ह्या प्रयोगशाळेत पहिले जीव आणले ती उन्हाळ्यात वाळली की कोट्यवधी जीव मरून जातात. सांदीकोपऱ्यात थोड्याशा चिखलात काही जिवंत राहतात. खूप थंडी पडून पाणी गोठले तरी बरेच जीव मरतात. पाण्यात काही विषार गेला तरी मरतात. जीवोत्पत्ती जास्त होऊन डबक्यातील पाण्यात पुरेसा अन्नरस राहिला नाही तरी लाखोंनी मरतात आणि शेवटी म्हणजे दुसरे निरनिराळे सूक्ष्म जंतू ह्या डबक्यातील जावाना खायला टपलेले असतात." त्यांनी लगेच गड्याकडून एक बादली आणली व तीतले थोडे थोडे पाणी नव्या तबकड्यात घालून वर्गाला परत सूक्ष्मदर्शकातून पाहण्यास सांगितले. आता तबकडीत फक्त अन्नरस व त्यावर पोसणारे एक-दोन जीव असे दृश्य नव्हते. तबकडीत नाना त-हेच्या सूक्ष्म वनस्पती व प्राणी पाण्यात इकडून तिकडे. फिरत होते. काही खाऊन खाऊन लठ्ठ होत व नंतर नवी जीवोत्पत्ती होई. पण खाणे थोडे म्हणून जीवोत्पत्ती भराभर न होता फारच सावकाशीने होत होती. तेवढ्यात दुसराच एक सूक्ष्म जीव येऊन त्याने नव्या प्रजेला खाण्यास सुरुवात केली व नव्यानेच जन्माला आलेल्या त्या अणमय जीवांची पळायची धडपड सुरू झाली. त्या जीवभक्षक जीवाला खाणारेही जीव त्या तबकडीत होते. शिवाय, एकमेकांना खाऊन भक्ष्य संपले म्हणजे भक्षकही उपासमारीने मरायच्या पथाला लागे आणि शेवटी पाहता-पाहता तबकडीतले पाणी संपले की, सगळ्याच जीवांची धडपड बंद पडायची- तबकडीतल्या विश्वावर मृत्यूची शांतता पसरायची.
 त्या प्रयोगशाळेतले प्रयोग मोठ्या प्रमाणावर डोळ्यांपुढे चाललेले आज दिसत होते- परुष-बाया येऊन आपली तपासणी करून घेऊन व विचारल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पढे चालले होते. “उंची चार फूट अकरा इच; पाच फूट तीन इंच..." एक माणस उंचीची मापे सांगत होता; "वजन अठ्याऐशी पौंड; शहाण्णव पौंड: एकशे एक पौंड..." शंभरावर वजन एकल की लिहून घेणारा डोळे वर करून, “आहे तरी कोण पैलवान!" अशा बुद्धान वर पाही. छातीचा घेर, श्वासोच्छवासाचा जोर, स्नायूचा जोर अशी एक-एक तपासणी होत होती. ती झाली म्हणजे लग्न कधी झाले; मुले किती

झाली? मेली किती? जिवंत किती?' अशी प्रश्नावली सुरू होई. वयाप्रमाणे
११८ / परिपूर्ती
 

कोणाला पाच, दहा, कोणाला बारा मुले झालेली आणि त्यांतील निम्मीशिम्मी जिवंत हे उत्तर यावयाचे! ह्या कृश, अर्धपोटी जीवांना एवढी मुले होतात तरी कशी? त्यातून ते जिवंत तरी कसे राहतात? पुरुषांचा ७० - ७५ रुपये पगार एवढ्या संसाराला पुरतो कसा? हे सर्व लोक खातात तरी काय?... अशी परिस्थिती असूनही त्या प्रांतातील लोकसंख्या सारखी वाढत होती. किनाऱ्यावरचे काम संपवून आम्ही पुढे निघालो. दुपारी बारा वाजतासुद्धा सूर्याचा प्रकाश संध्याकाळसारखा वाटत होता. अशा अरण्यातून जाता जाता मध्येच एक मोठा मोकळा प्रदेश दिसला. प्रचंड वृक्षांचे जळके बुंधे तेवढे उरले होते. बायका-पुरुष तेही खणून टाकायच्या उद्योगात होते. जरा पुढे गेलो तर जंगल जाळून साफ केलेल्या जागेत नवी शेती झाली होती. कोठे बटाटे व टापिओकाचे पीक लावले होते. किनाऱ्याजवळ शेतीत माणसांची पोटे भरत ना म्हणून सरकार पर्वतराजीवरील जंगले कापून शेतकऱ्यांना लागवडीसाठी नवीन जमीन देत होते. वाढत्या तोंडांची भूक भागवायची असा पण केला तर त्रावणकोरमधली अरण्ये साफ होऊन तेथे पूर्व महाराष्ट्रातल्यासारखे उघडेबोडके डोंगर दिसू लागायला एक शतकाचासुद्धा अवधी नको.
 फक्त त्रावणकोर-कोचीनच्या तबकड्यांतून जीव वाढताहेत असे नाही. ह्या प्रयोगशाळेत ठिकठिकाणी अशा तबकड्या आहेत व त्यातून सर्व त-हेचे जीव भराभर वाढत आहेत. पुरी जिल्हा व चिल्का सरोवर ही डोळ्यांनी पाहावयास पृथ्वीवरील स्वर्गासारखी आहेत. पुरी जिल्हात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असंख्य जलसंचयांवरून कमळाच्या पानांचे दाट आवरण असते व त्यांत निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, तांबड्या रंगांची कमळे उगवलेली असतात. जसे रंग विविध तसे आकार पण विविध. बचकेत मावणार नाही एवढ्या मोठ्या कमळापासून तो सदाफुलीच्या फुलाएवढी चिमुकली कमळे त्या पाण्यात चमकत असतात. कमळ्यांच्यामागे हजारो एकर जमिनीवर भाताचे पीक डोलत असते. आश्विनाच्या महिन्यात ते इतके दाट असते की, हिरव्या-पिवळ्या गालिच्यात मुळी फटसुद्धा दिसत नाही. मध्ये खंड असलाच तर आंबा, केळी, पुन्नाग व नारळीच्या बागांचा. चिल्का सरोवराचे काठी भातशेती व बागाईत तर आहेच; पण शिवाय सरोवरात मासे उत्तम मिळतात व ते ताजे मिळावे म्हणून लोक मुद्दामसुट्टीत

येथे येऊन राहतात. चिल्काच्या अथांग जलाशयावर सूर्योदय अतिरम्य
परिपूर्ती / ११९
 

वाटतो. दुपारच्या उन्हात तळपताना दृष्टी ठरत नाही, पण ते सुरेख दिसते व संध्याकाळच्या सावल्या दाटू लागल्या म्हणजे सरोवरावरून हजारोंच्या थव्यांनी पक्षी उडत काठाशी असलेल्या घरट्यात जातात तेव्हा तर क्षणाक्षणाला बदलणाऱ्या काळोखणाऱ्या सरोवराच्या काठांवरून हलूच नयेसे वाटते. पण अधाशीपणे ही दृश्ये पिणाऱ्या डोळ्यांना प्रायश्चित्तही लगेच मिळते. कोणी नवीन पाहुणे आले ह्या कुतूहलाने खेड्यातील माणसे गोळा झाली होती. त्यांच्या वाढत्या गलबल्यामुळे लक्ष वेधून मी सरोवराकडची नजर काढून मागे वळले. वीस-पंचवीस माणसे होती, पण त्यातील फार तर निम्मी अव्यंग होती. कोणाची बोटे गेलेली, कोणाच्या पायांचे नुसते खुंटच, कोणाची नाके किंवा कान सडलेले, अशी होती. उडिशाच्या सरकारने माझ्याबरोबर एक तद्देशीय मदतनीस दिला होता, त्याला मी विचारले, “ह्या गावात महारोग्यांची वसाहत आहे वाटते?"
 “नाही. चिल्का सरोवराच्या भोवतालच्या खेड्यापाड्यांतून महारोगाचा फार प्रसार आहे."
 त्याच्या म्हणण्याचे प्रत्यंतर दोन-चार दिवसांच्या पाहणीत आलेच. रोग अंगात शिरल्यापासून त्याची लक्षणे शरीरावर दिसायला बारा वर्षे लागतात म्हणे; पण मला तर कित्येक महारोगी मुले दिसली! मला त्या वेळी तरी त्यांचे वय बारांपेक्षा कमी वाटले. मग काय गर्भातच त्यांना संसर्ग झाला होता की, मुले मोठी असूनही वाढ खुंटल्यामुळे लहानखोरी दिसत होती कोण जाणे! महारोगी नाही असे एकही झोपडे नव्हते. रोगी निरोगी सगळे एके ठिकाणी राहावयाचे, जेवायचे व झोपायचे. प्रत्येक झोपड्यात पाच-पाच, दहा-दहा मुले होती. उष्ण हवेमुळे कपड्यालत्त्यांची फारशी जरूर नव्हती. जमिनीत भाताचे पीक भरपूर येते. सरोवरात बारमास मासे मिळतात. शेजारच्या जंगलात शिकार व लाकूड मिळते. सृष्टी अनंत हस्तांनी देते आहे, लोकसंख्या वाढत आहे व त्याबरोबरच रोग्यांची संख्याही वाढते आहे. ह्या तबकडीत महारोगी किती भराभर वाढू शकतात ह्याचा प्रयोग चालला आहे. परीला जाताना असेच झाले. प्रत्येक खेड्यापाड्यातून आणि विशेषतः क्षेत्राचे ठिकाण म्हणून पुरीला इतके लोक हत्तीरोग झालेले पाहिले की, कधी येथन सुखरूप बाहेर पडते असे झाले. धडापेक्षाही हात व पाय पाहिले म्हणजे दर वेळी घृणा, भीती व अनुकंपेने मन पिळवटून निघावयाचे.

उडिशाच्या सबंध पूर्वपट्टीत ह्या लोकांच्या पैदाशीची प्रयोगशाळा आहे.
१२० / परिपूर्ती
 

पण उडिशाच का, सगळ्या भारतात, सर्व प्रांतातून आज अधिकाधिक वाढ कसली होत असेल तर ती माणसांची.
 काही वर्षांपूर्वी एक भिकारीण व तिची तीन मुले लहान मुलांच्या कोर्टापुढे आली होती. मुलांची आई वेडी होती. तिचे आईबाप, भाऊ, नवरा, कोणी आप्तेष्ट चौकशी करून आढळले नाहीत. वेडी म्हणजे चिंध्या चिवडणारी नव्हे... पण अर्धवट. कोर्टामध्ये तिने वारकऱ्याचे अभंग म्हणून कीर्तनकारांच्या शैलीने जीवनाचे असारत्व, पंढरीचे माहात्म्य, संतांचा त्याग व नि:स्पृहपणा ह्यावर आम्हाला चांगलेच प्रवचन दिले. मुले पोसणे तिला शक्यच नव्हते म्हणून सरकारने ती ताब्यात घेतली. चार वर्षांनी पाहते तो परत तीच वेडाबाई एक मूल हाताशी व एक स्तनाशी धरून कोर्टात उभी! गोड हसून तिने मला सांगितले, “तुम्हाला द्यायला आणखी दोन आणली आहेत!"
 वेडी-शहाणी, लुळी-पांगळी, रोगी-निरोगी, गरीब-श्रीमंत सर्वांच्या हातून लोकसंख्येत सारखी भर पडते आहे. तिसाचे चाळीस कोटी झाल, आता ह्या वर्षांच्या शिरगणतीत आणखी कितीची भर पडते म्हणून सर्व जग कुतूहलाने भारताकडे पाहत आहे.
 भारतासारखे काय इतर देश नाहीत का? चीनही अत्यंत दाट वस्तीचा प्रदेश आहे असे ऐकतो. तेथेही लोकसंख्या वाढतच असणार. चीन काय किंवा इतर काही देश काय; लोकसंख्या दाट खरी, पण तिची वाढ भारताइतकी झपाट्याने होत नाही. ह्याचे कारण म्हणजे एका ऐतिहासिक घटनेमळे. जिवाच्या पैदाशीसाठी लागणारी परिस्थिती भारतात गेल्या शतकात जशी निर्माण झाली तशी इतरत्र कोठेही आढळत नाही.
 इंग्रज यावयाच्या आधीचा महाराष्ट्राचाच इतिहास घ्या ना! अठ्ठावन्न सालचे बंड, पेंढाऱ्यांचा उपद्रव, दुर्गादेवीचा दुष्काळ, पानिपतच्या लढाया, निजामाशी लढाया, कर्नाटकातील लढाया, शिवाजी व राजाराम ह्याच्या वेळचे सतत पावशतकाचे स्वातंत्र्ययुद्ध ह्यात सारखी माणसे मरत होती. मूल होण्याच्या वयाच्या तरुण पोरी विधवा होत होत्या. प्रजोत्पत्तीला आळा बसत होता. मराठी इतिहासाचे एक गाढे विद्वान असे सांगतात की, "औरंगजेबाच्या फौजेत असलेले तरुण जवान म्हातारे होऊन दिल्लीला पोचले व सर्व उमेद रणांगणावर गेल्यावर कित्येकांचे निर्वंश झाले असे एका

जुन्या बखरकाराने लिहिले आहे." ही परिस्थिती जेत्यांची तर खुद्द ज्यांच्या
परिपूर्ती / १२१
 

भूमीवर युद्ध चालले होते, त्यांच्या कुटुंबांची किती धूळधाण झाली असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. त्याच्याही मागे गेले तरी मुसलमान राजवट, यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, शातवाहन, अगदी ख्रिस्त शकाच्या पूर्वीपासूनचा इतिहास म्हणजे दोन हजार वर्षांच्या लढायांचा व राज्यक्रांत्यांचा इतिहास आहे. महाराष्ट्र इतरांशी लढत होता व इतर महाराष्ट्राशी लढत होते. सर्व भारतभर राष्ट्राराष्ट्राचे लढे चालले होते. लढाई, अशांतता, झगडा ही राष्ट्रांची नेहमीची प्रकृती होती व दीर्घकालीन शांतता हीच विकृती होती. जी लढाईत मरत नसत अशा अर्भकांना पटकी, देवी, उपासमारी घेऊन जात. पण इंग्रजांच्या राज्यापासून ही स्थिती पार बदलली. सबंध देशभर शंभर वर्षांवर शांतता नांदली; पेंढारी वगैरे लुटारूंचा नायनाट झाला. अंतर्गत युद्धे मुळीच नव्हती व बाहेरचे वैरीही नव्हते. अशी राजकीय परिस्थिती संबंध मानवेतिहासात पूर्वी कधी कोणत्याही राष्ट्राला मिळाली नाही. पाश्चिमात्त्यांच्या वैद्यकीय ज्ञानात जी भर पडली तिचा फायदा आपोआपच भारताला मिळाला. सबंध गावेच्या गावे निर्मनुष्य करणाऱ्या पटकी, देवी वगर रोगांवर ताबडतोब इलाज होऊ लागला. पोस्टाच्या सोयीने एका प्रांतात जे काय चालले असेल त्याची बातमी थोडक्या वेळात दुसऱ्या प्राताना मिळू लागली. आगगाड्यांमुळे इकडचे धान्य तिकडे हालवता येऊ लागले. हिंदुस्थानात दरवर्षी कोठे ना कोठे तरी अतिवृष्टीमुळे वा अनावृष्टीमुळे दुष्काळ हा असतोच; पण इंग्रजांच्या वेळेपासून एका प्रांतातले धान्य दुसरीकडे जाऊ लागले व दुष्काळामुळे होणारे मृत्यू बरेचसे टळले. बालमृत्यूचे प्रमाण मोठे असले तरी पूर्वी तरुण पुरुष लढाईत, साथीत किंवा उकाळात जे बरेचसे मरत ते मरेनासे झाले. शांततेमळे स्त्रियांना व कुटुंबाना स्वास्थ्य लाभले व प्रजोत्पादनाच्या मार्गातील सर्व आडकाठी दूर होऊन यूच मागे मात्र बरेचसे बंद झाले. भारताच्या बहतेक विभागांचे हवापाणी जन आहे की, वस्त्रप्रावरण फारसे नसले तरी चालते. घरेही अगदी तुटपुंजी असली तरी तेवढा निवारा परतो व अशा भूमीवर प्रजोत्पादनाची प्रयोगशाळाच जणू स्थापन झाली.
 इग्रजांच्या राज्यस्थापनेपासन आतापर्यंत भारताची भूमी तितकीच शाहली... नव्हे, फाळणीमळे संकोचच पावली आणि प्रजा मात्र दुप्पट झाली. । ता फार झाली असे वाटत नाही, वाटत असले तरी कोणी तसे

बोलत नाही. कारखानदारांना वाटते. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी मजुरांची
१२२ / परिपूर्ती
 

संख्या जास्त व पगार कमी. हिंदूंना वाटते, मुसलमान वाढत आहेत, आम्ही का नको? रोमन कॅथॉलिकांनी तर जास्तीत जास्त प्रजोत्पत्ती करून जगच व्यापण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या सर्व भाषांतील वर्तमानपत्रांतून व मासिकांतून मोठ्या कुटुंबाचे फायदे वर्णन करणारे लेख येत असतात. मजूर पुढाऱ्यांना वाटते, जितकी खायला तोंडे जास्त तितकी उपासमार जास्त, जितकी उपासमार जास्त तितकी अशांतता व क्रांतीची बीजे पेरण्यास योग्य भूमी; म्हणून तेही लोकसंख्येबद्दल बोलत नाहीत. शिवाय, लोकशाहीच्या काळात एका माणसाला एक मत असते व ते आंधळ्या, लुळ्या, रोगी, मरणप्राय माणसाचे असले तरी त्यांची किंमत एकाच मताची. म्हणून निरनिराळ्या पक्षांना व धर्मांना आपल्या पक्षाची, धर्माची वा जातीची लोकसंख्या जास्तीत जास्त हवी असते. चालत्या प्रेतांनी मते दिली तरी त्यांना चालेल, पण ती मिळावीत ही त्यांची धडपड. कोणी अधिक धान्य पिकवा सांगते, कोणी धान्याची भीक मागत जगभर हात पसरते, कोणी सभासभातून ब्रह्मचर्याची तोड सुचवतात आणि इकडे जीवोत्पादन झपाट्याने होतच आहे.
 अन्नरसाचा क्षीरसागर आटत चालला आहे. अर्धपोटी जिवांचे त्राण नाहीसे होत चालले आहे. भारताच्या असंख्य तोंडात घास भरवील अस कोणाही राष्ट्राचे आज सामर्थ्य नाही. क्षीरसमुद्र आटला की बहुतेक जाव तडफडून मरतील. असंख्य मढ्यांनी खतावलेल्या भूमीवर परत जारात अन्नोत्पादन होईल. अल्प स्वल्प राहिलेल्या जीवांना परत जगण्या- वाढण्याला योग्य परिस्थिती मिळेल व परत नव्याने प्रजोत्पादनाचा प्रया' सुरू होईल.