Jump to content

पण बॅट् नाहीं ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> चक्क खोटा डिसिजन् ! कॅच असेल कोठून ? बॅटला बॉलच जर मुळीं लागला नाहीं तर - दुसरें काय ! वुइकिटकीपरनें विचारलें, अंपायरनें ' हो ' म्हटले. मामा लेकाचा ! - किती बेचाळीसच ना ? - उं: ! कांहीं फार झाल्या नाहींत ! - अरे चांगला सेट् झालों होतों, सहज सेंचरी निघाली असती ! - हुश्श ! बॉय ! सोडा लाव ! छे बोवा ! आज फारच थकलों ! छान म्हणजे ? राव बिजली आहे बिजली ! गन् अँड् मूरचा आटोग्राफ आहे ! बॅट् हलकीसलकी नाहीं ! पैसेच तसे मोजले आहेत ! - अरे तिचें आधीं केनच किती कॉस्टली आहे ! अन् खेळायला काय ! अगदीं फुलासारखी ! इतकें त्या - तो इकडचा बोलर नाहीं ? - इतकें त्याचें बोलिंग मारलें ना ! पण हाताला हूं की चूं नाहीं ! - कटिंगला तर बोलायलाच नको ! नुसती टाकायचा अवकाश, कीं ऐसा बॉल जातो आहे ! नुसते पहात रहावें ! बॅट म्हणजे दिलजान् आहे ! हजार पांचशेंतून निवडून काढली आहे ! उगीच नाहीं ! - पहा ! आहे ? अगदीं त्रिफळा उडाला ! लाख वेळां सांगितलें कीं, बॅकवर्ड खेळूं नको म्हणून ! आले आतां हाका मारीत ! नेक्सट कोण भिडे जातो आहे ना ? - जपूज खेळ रे बोवा - लेगब्रेक आहे ! जरा संभाळून ! नाहीं तर होशील बबड्याजीराव ? - काय ? बॅट् ? माझी बॅट् देऊं तुला ? हात जोडतों ! भाई माफ कर ! तेवढें नाहीं व्हायचें । दुसरें काय हव्वें तें - अगदी माझ्या जिवाचें माणूस - स्वतःचा जीव मागितलास तरी देईन ! पण बॅट् नाहीं हो !....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.