दोष आणि प्रीति

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

दोष असती जगतांत किती याचें
नसे मजला सामर्थ्य गणायाचें;
दोष माझा परि हाच मला वाटे,
दोष बघतां सत्प्रेम कसें आटे?

दोष असती जगतांत--असायाचें;
मला त्यांशी तरि काय करायाचें?
प्रेमगंगेच्या शुद्धसिंचनेंही
शुद्ध होइ न जो, दोष असा नाहीं.

गड्या पूर्णा! मज आस तुझी नाहीं;
सख्या न्यूना! ये मार मिठी देहीं,
प्रीति माझ्या हृदयांत करी वास.
न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास!


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg