दत्ताची आरती/ पतिव्रता सती अनुसया माता

विकिस्रोत कडून


पतिव्रता सती अनुसया माता ।
भक्तीनें पाहुनियां तारिसी अनंता ।
अत्रिऋषीच्या तपा तुष्टसि भगवंता ।
इच्छित पुरवित धांवसि हे त्रिगुणातीता ।
ब्रह्मस्फूर्ती मूर्ती निजभक्तताता ।
तुझिया प्रसादे कैवल्य हाता ॥ १ ॥

जय देव जय देव दत्तात्रय सिद्धा ।
आरती ओवाळूं ॐकार शुद्धा ॥ धृ. ॥

शंखचक्र गदाकटिसूत्र नागा ।
दंडड कमंडलु डमरु स्वरुपिं सदा जागा ॥
जटामुकुट कुंडले कर्णी शोभत आहे ।
षट्‌पाणीद्वय जंधा पदिं जान्हवी वाहे ॥
गौरश्या मश्वेत त्रिशीर विलसत हे ।
वक्षस्थळ कटिप्रदेश अतिशोभत आहे ॥ जय ॥ २ ॥

धूर्मितलोचन भाळी त्रिपुंड चमकतसे ।
भस्मोध्दूलन व्याघ्राजिन प्रावर्ण असे ॥
नित्य प्रयागी स्नान करवीरी भिक्षा ।
श्वानासंगे चेष्टिस मातापुरी दीक्षा ॥
हिंडसि चेष्टसि भेटसि भक्तां प्रत्यक्षां ।
देउनि शमना अमना उन्मनिच्या साक्षा ॥ जय ॥ ३ ॥

निखिल ब्रह्म उघड हे विरचित स्वानंदे ।
प्रवर्तवर्तीछंदे निजपरमानंदे ॥
स्थूलसुक्ष्मसाक्षी तो प्रगट हाची ।
सुभट झाला झल्लित ज्योती निजज्योती ॥
भक्तप्रेमा मोहसि करिसी साऊली ।
तुकयासाठी धावे वत्सा माऊली ॥ जय देव ॥ ४ ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.