दत्ताची आरती/ देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी
Appearance
देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी ।
अक्षय सुख अवदुंबर छाये विचरसी ॥
श्रीकृष्णातटिं रहुनि दासा उद्धरिसी ।
जढमूढां तारया अवतार धरिस ॥ १ ॥
जय जय श्रीदत्तात्रय औदुंबरवासी ।
मंगल आरति करितो मम भवभयनाशी ॥ धृ. ॥
काय तुझा महिमा वर्णावा आतां ।
मारिसि भूतसमंधा सक्रोधें लाता ॥
नानारोग दुरत्वय तव तीर्थ घेतां ।
पुनरपि श्रवण न ऎकति गदरिपुची वार्ता ॥ जय. ॥ २ ॥
तुझें क्षेत्र मनोहर या अवनीवरती ।
त्यातें पहातां वाटे स्वर्गासम धरती ॥
आनंदे द्विज भारत पारयण करिती ।
त्रिकाळ सप्रेमानें करिती आरती ॥ जय. ॥ ३ ॥
मी अधसागर तूं हो अगस्तिऋषि देवा ।
प्राशूनि वारी दे मज त्वत्पदिंचा ठेवा ॥
बाधों ना मज किमपि प्रापंचिक हेवा ।
दास म्हणे हे बाळक आपुल्या पदिं ठेवा ॥ जय. ॥ ४ ॥
| हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
