दत्ताची आरती/ जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा ।
अनुसया निजबालक म्हणविसी जगमित्रा ॥
जगदुद्‌भ वातिप्रलयां कारण आदिसुत्रा ।
ब्रह्म चिदंबर सुरवरवंद्य तूं सुखवक्त्रा ॥ १ ॥

जय देव जय देव जय दत्तात्रेया श्रीदत्तात्रया ।
भवहर वंदित चरणां सद्‌गुरुवर सदया ॥ धृ. ॥

भक्तिज्ञान विरागास्तव हे सन्मूर्ती ।
नरसिंहा दिक म्हणविसि अपणा सरस्वति ॥
यतिवर वेषा धरुनी रक्षिसि धर्मरिती ।
दर्शनस्पर्शनबोधें पावन हे जगती ॥ जय देव. ॥ २ ॥

विधिहरि शंकररुपा त्रिगुणात्मक दीपा ।
सच्चिन्मय सुखरुपा केवळ अरुपा ।
स्थानत्रय देहत्रय तापत्रय कुणपा ।
विरहित सर्व अपाधी निर्गत भवतापा ॥ जय. ॥ ३ ॥

अगणित प्रलयांबूसम चिद्‌घन रुप तुझें ।
बुब्दुवत जग सर्वहि जगदाभास सुजे ॥
विवर्त सिद्धांत हे मृषाचि सर्व दुजे ।
अर्द्वता करिं पावन निर्भय पादरजें ॥ जय. ॥ ४ ॥

अज्ञानां धसमुद्रा करि शोषण भद्रा ।
अनादि जीव कुनिद्रा पळविं तूं अमरेंद्रा ।
निजजनच कोरचंद्रा अवगुण जडतंद्रा ।
नाशय कुबुद्धि मौनी वंदित पदमुद्रा ॥ जय. ॥ ५ ॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg