दत्ताची आरती/ जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


जय देव जय देव जय अवधूता ।
अगम्यें लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ धृ. ॥

तुझें दर्शन होतां जाती हीं पापें ।
स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥
चरणी मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें ।
वैकुंठीचे सुख नाही यापरतें ॥ जय. ॥ १ ॥

सुगंधकेशर भाळीं वर टोपीटीळा ।
कर्णि कुंडलें शोभति वक्ष:स्थळि माळ ॥
शरणांगत तुज होतां भय पडलें काळा ।
तुझे दास करिती सेवासोहळा ॥ जय. ॥ २ ॥

मानवरुपी काया दिससी आम्हांस ।
अक्कलकोटी केंला यतिवेषे वास ॥
पूर्णब्रह्म तोची अवतरला खास ।
अज्ञानी जीवांस विपरीत हा भास ॥ जय. ॥ ३ ॥

निर्गुण निर्विकार विश्वव्यापक ।
स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥
अनंत रुपें धरिसी करणें मायीक ।
तुझें गुण वर्णिता थकले विधिलेख ॥ जय. ॥ ४ ॥

घडता अनंतजन्यसुकृत हें गांठी ।
त्याची ही फलप्राप्ती सद्‌गुरुची भेटी ॥
सुवर्णताटी भरलीं अमृतरसवाटी ।
शरणागत दासावरि करी कृपादृष्टी ॥ जय. ॥ ५ ॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.