दत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


आरती आरती दत्त ओंवाळू दाता । स्वामी ओंवाळूं दाता ।
आरतीचें हरण दत्तें केले तत्वत्तां ॥ धृ. ॥

आरती खुंटली आतां ओंवाळूं कैसे । स्वामी ओंवाळूं कैसे ॥
तरी भजन निरंजनी नित्य होतसे ॥ आरती. ॥ १ ॥

आरतीचे आर्त पुरविले श्रीदत्ते ।
एकाजनार्दनी सहज ओंवाळींतसें ॥ आरती. ॥ २ ॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg