त्यांत रे काय ऐकायचंय ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> पेट्रोल वगैरे आहे ना रे भरपूर ? - ठीक आहे ! तबेल्यांतून आणलीस कीं निघालोंच आम्ही ! - छे हो ! नाहीं जमलें बोवा आज सकाळी फिरायला जायचं ! सगळा वेळ त्या बक्षीस समारंभांत मोडला ! आठ वाजल्यापासूज जें सुरु झालं, तें दहा साडेदहापर्यत चाललं होतं आपलं ! अस्सा कंटाळा आला होता कीं, ज्याचं नांव तें ! - नकोसं झालं होतं अगदीं ! बरं, मधेंच उठून येईन म्हटलं, तर तिकडूनही पंचाईत ! कारण समारंभाची मुख्य देवता .... अध्यक्षच पडलों आम्ही, तेव्हां थोडंच कुठं हालतां येतं आहे ? - हें म्हणा रे, तें म्हणा रे, स .... गळं कांहीं होईपर्यंत मग - शीः ! कसली व्यवस्था अन् काय ! .... चाललं होतं आपलं कसं तरी ! - अहो, मुळीं हेडमास्तरनाच कुणी विचारीना, तिथं कोण जुमानतो अध्यक्षाला अन् फध्यक्षाला ! मारे जोरजोरानं ओरडून बिचारा सांगत होता कीं, ' हें पहा ! हे जे आपले आजचे सन्माननीय पाहुणे आहेत कीं नाहीं, ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ! फार त्यांना शाळेचा अभिमान आहे ! ' - झा.... लं ! असं म्हणतांच, जो कांहीं टाळ्यांचा, अन् बाकांवर हातपाय आपटण्याचा धडाका सुरु झाला, तो कांहीं .... राम ! राम ! .... पुसूं नका ! म्हटलं आतां शाळा पडते कीं काय होतंय तरी काय ! पुढं हीच रड आमच्याही भाषणाच्या वेळीं ! - अहो, कारटीं आवरतां आवरेनात ! हा उठतो आहे, तो ओरडतो आहे, गोंधळ इथून तिथून ! अन् जरा कांही झालं कीं नाही, कीं टाळ्या अन् दणदणा हातपाय आपटायचे ! - काय हें ! छे बोवा ! आपल्या वेळेला होतं कांहीं असं ? - हेः ! तर्‍हाच कांही वेगळी आजची ! काय पोरं, अन् काय मास्तर ! वा रे वा !! - जाऊं द्या झालं ! सगळीच जिथं घाण .... रॉटन झालं आहे, तिथं काय आपण तरी - चला ! आली मोटार वाटतं दाराशीं - पण हे.... चिरंजीव कुणीकडे निघाले आहेत आमचे ? फिरायला न्यायचं म्हणतों मी त्याला ! - अप्पू, ए अप्पा ! कोणीकडे निघाला आहेस ? ग्राउंडांत - काय असतं रे रोज उठून तिथें ? चल आज बरोबर फिरायला ! - पुरे रे बोवा ! असेल बोलावलं मास्तरांनीं ! - आहे ठाऊक किती ऐकतां तुम्ही तें ! - हँततेच्या ! येवढंच ना ? म ... ग रे काय ! चल ये बैस लवकर ! - भिकार स्काउटिंग तें काय ! अन् त्यांत रे काय ऐकायचं येवढं त्यांचं ! ....

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.