गोदावरीस्तव

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

श्रीमति ! गोदावरि ! तो मोदा वरितो, तुज्या सदापा पी, कीं जो तव स्तव करी, जेणें तरती सुखें सदा पापी. ॥१॥


देतिस जना अभय, तूं असिच, सदा कलिस ताप लागो, दे. कृतकृत्य करीं लोकीं शरणागत सर्व आपला गोदे ! ॥२॥


ताप हरिसि तूंचि, जरिहि वदति ‘ निववितोसि शीतगो ! देहा, ’ तरि तेचि पुन्हां म्हणती, होवुनि संसारभीत, ‘गोदे ! हा ! ’ ॥३॥


व्याजें दे ती धर्मज्ञकविसभा, गोदे ! तूं अघ सुखेंचि हरिसी, त्वद्भक्ता, जेंवि रविस भा, गो दे. ॥४॥


पोटीं घालिसि मंतु स्वस्नानें करिसि मुक्त तूं जंतु. कवि तवसंनिधितंतु स्तविति, म्हणति, ‘ न: परे तु मा संतु. ’ ॥५॥


त्र्यंबकजटाप्रसूते ! पापिजनोद्धृतिविनोदचशगोदे ! गौतममुनिचें केलें त्वां विश्वख्यात पुण्य यश गोदे ! ॥६॥


’ गे ! माते ! गंगे ! ये, पाव, ’ असी हाक मारित्या ‘ ओ ’दे. जो देव त्यंबक विभु, त्याची करुणा सुकीर्ति तूं गोदे ! जो श्रीराम वसे तव तीरीं, क्रीडा करी वरवनांत झाला, श्रीगोदावरि ! तो दाव रिपुक्षपाचरवनांत. आद्ये ! गंगे ! गौतमि ! कोण न वांछील मग तुझ्या संगा ? तुजसह वर्षभरि वसे प्रेमें, नेमेंचि, जाह्नवी गंगा. बहु उद्धरिले, हें तव, हरिहरयशसेंचि, यश तगो; देया दे मुक्ति रामतनया, वर दुसरे इष्ट न शत गोदे ! या.हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.