गणपतीची आरती/हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

हेरंबा... आरंभा... वंदन विघ्नेशा शिवसुता मज तुझी कृपाभिलाषा अष्टौप्रहरी चित्ती तव नामघोषा नतमस्तक श्रीचरणी भक्त सर्वेशा॥१॥

जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥ध्रु०॥

साजिरी गोजिरी मोहक मुर्ती चराचराची चैतन्यस्फुर्ती गजमुख ज्ञानेश्वरा तू इच्छापुर्ती अंतरी उधाण मांगल्यभरती जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥२॥

विराजे मंचकी आदी अंतिमा चतुर्भुज सुशोभित प्रतिमा तेजाने ओजाने दग्ध काळिमा दिव्यप्रभांकीत मुखचंद्रमा जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥३॥

वक्रतुंडाहाती मोदक ज्ञानाचा परशू करी नाश अवघ्या विघ्नांचा हर्ता अंकुश धारी षडरिपूंचा शुभाय आशिष देई सौख्याचा जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥४॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg