गणपतीची आरती/सकल कलांचा उद्गाता

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध

<poem>

सकल कलांचा उद्गाता गुणेश गजानन भाग्यविधाता॥ध्रु०॥

प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत गणनायक शुभदायक दैवत या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता॥१॥

आदिदेव ओंकार शुभंकर मी नतमस्तक या चरणांवर तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता॥२॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg