गणपतीची आरती/जय जय श्रीगजवदना

विकिस्रोत कडून

<poem>

जय जय श्रीगजवदना, हे गणराया, गौरिकुमारा हो करुणाकर सुकुमारा, महारणधीरा, गुण गंभिरा, हो ॥ध्रु०॥

शेंदुरवक्‍त्र-सुरंगित, अनुपम दोंदिल, रुप साजरें हो शुंडादंड सुशोभित, सदा मद गंडस्थळिं पाझरे हो कनक-कटक-मुकुटाच्यावर जडिताचे चमकति हिरे हो श्रीकृष्णागरु चंदन अंगीं उटि मर्दित केशरें हो मस्तकिं धरिसी बरवा हिरवा मरवा दुर्वांकुरा हो ॥जय जय० ॥१॥

कसित पितांबर पिवळा, गळां हार पुष्पांचे डोलती हो तळपति कुंडलें कर्णीं, पंखे कर्णांचे हालती हो सिद्ध, सरस्वति, ऋद्धि, सिद्धि, बुद्धीनें चालती हो रुणझुण पैंजण चरणीं, वाणि गीर्वाणी, बोलती हो वंदिति सुरनर पन्नग, निजगण वारिति शिरिं चामरें हो ॥जय० ॥२॥

सकळ मंगळारंभीं, सकळहि चिंतित चिंतामणी हो चिंतन करि चतुरानन, गुणगण वर्णी दशशत फणी हो नामस्मरणें पळती, कोटी विघ्नांच्या त्या श्रेणी हो उद्धरि भक्‍त न हलतां, किंचित नेत्राची पापणी हो त्राता तूं सर्वत्रां, रविशशिइंद्रासह सुरवरां हो ॥जय जय० ॥३॥

शरणांगत मी आलों, तुज फरशांकुश-मोदक-धरा हो धांवे, पावे, कृपा कर सत्वर, यावें लंबोदरा हो ओवाळिन आरती उजळुन दीपावळी कर्पूरा हो वाहुनिया पुष्पांजलि पदयुग वंदिन जोडुन करा हो विष्णुदास म्हणे, करी पावन वर देउनि किंकरा हो ॥जय जय० ॥४॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.