गणपतीची आरती/शिवतनया आजि दे मतिला

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> शिवतनया आजि दे मतिला ॥

आरती तुजला करिन मी भावें । वर दे तू मजला ॥ १ ॥

संकटनाशक बुद्धिप्रकाशक। नमितों मी तुजला ॥२॥

सिंदुरचर्चित शुंड विराजित। मुषकावरि बसला ॥ ३ ॥

मंगलदायक नाम तुझे मुखी । जपतां हरिं तरला ॥ ४ ॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg