गणपतीची आरती/जय जय जी शिवकुमरा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>


जय जय जी शिवकुमरा प्रणतवत्सला । ओवाळीन पंचारति देई सुमतिला ॥ धृ ॥

लंबोदर वक्रतुंड शोभतें किती । मोरमुकुट वैजयंती कंठी झळकती ॥ कनकवलय तोडर ते बहुत विलसती । होतो बहु तोष मनीं पाहुनीं तुला ॥ १ ॥

त्वत्स्वरुप त्वद्‌गुण हे स्वांति आणुनी । ओंवाळिन पंचारती लुब्ध होऊनि ॥ विनवितसे दत्तात्रय लीन भाषणी । भवतरणा अध वारुनि उद्धरी मला ॥ २ ॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg