गणपतीची आरती/मंगलदायक सिद्धीविनायक

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

मंगलदायक सिद्धीविनायक आरती ही तुजला । करितों भावे दुर्वापुष्पे वाहुनी चरणाला ॥ धृ ॥

कार्यारंभी पूजन तुझे सकल जन करिती । इच्छा पूरवूनी सकलां देसी सुखशांती सुमती ॥ १ ।।

सिंदुरखल मातुनी जेव्हा उपदाव केला । भक्त रक्षणासाठी धावुनी सिंदुरखल वधिला ॥ २ ॥

ऎसा अगाध महिमा तुझा परम अपार । वर्णावया शेषही थकला थकले सुरवर ॥ ३ ॥

दीनदास मी तुझ्या प्रसादा । तिष्टतसे दारी । प्रसन्न होऊनी निजदासाला संसारी तारी ॥ ४ ॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg