गणपतीची आरती/त्रिपुरासुर वधु जातां

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> त्रिपुरासुर वधु जातां शिव तुजला चिती। बळिबंधन कराया वामन करि विनंती॥ धाता सृष्टि सृजितां न चले मंदमती। स्मरण करितां तुझे मग झाली स्फ़ूर्ती॥१॥

जय देव जय देव जयजी गणराया। हरिहरब्रह्मादिक ते वंदिती तव पाया॥धृ.॥

धरणी धरित मस्तक शेषाला ओझें। जाहालें तेव्हां स्मरण करि पै तुझे॥ हळुवट पुष्पप्राय घेले गणराजें॥ सुकीर्तीमहिमा घोषे भुवनप्रय गाजे॥ जय.॥२॥

महिषासुरासि वधिता पार्वतिही समरी। विजया देही म्हणुनी प्रार्थी गौरी॥ गाती मुनिजन योगी सिद्धादिक सौरी। तुझिया वरदे जिंकिती मन्मथ नरनारी॥जय॥३॥

पंडीत रामात्मज हा कवि किंकर तुझा। विनवी तुजला भावें पावें निजकाजा॥ ऋद्धीसिद्धीदाता तो स्वामी माझा। संकट हरुनि रक्षी भक्तांची लज्जा॥जय.॥४॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg