गणपतीची आरती/जय देव जय देव जय वक्रतुंडा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥

प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥
रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥

सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक तातक थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥

अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करिं भ्रमणा ॥ ३ ॥
<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg