Jump to content

गणपतीची आरती/गणपति नमिती स्तविती

विकिस्रोत कडून

<poem> गणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती। सकलारंभी स्मरती विघ्ने संहरती॥ शुंडामांडतमूर्ती अतर्क्य तव कीर्ती। आरती कवणालागीं देई मज स्फ़ूर्ती॥१॥

जय देवा जय देवा सुंदरगजवदना। तव भजनासी प्रेमा देई सुखसदना।जय.॥धृ.॥

जागृति स्वप्नी माझ्या हृदयी त्वां राहावें। दुरतर भवपाशाच्या बंधा तोडावें॥ सिंदूरवदना सखया चरणा दावावें। अघोरदुर्गतिलांगी सत्वर चुकवावे॥जय.॥२॥

न कळे अगाध महिमा श्रीवक्रतुंडा। अतर्क्य लीला तुझी शोभे गजशुंडा॥ तुजविण न दिसे देवा शमविल यम पीडा। भक्तसंकट येसी धावत दुड्दुडां॥जय.॥३॥

नयनी शिणलो देवा तव भेटीकरितां। तापत्रय दीनाचे शमवी समर्था॥ अनाथ मी कल्पदुम तूंची शिव सूता। विष्णूदासें चरणी ठेवियला माथा।जय देवा.॥४॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.