खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी
Jump to navigation
Jump to search
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२ - १९४८) ह्यांचा १९११ सालातल्या संगीत मानापमान मधील हे पद ज्यास गोविंदराव टेंभे ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.
पद[संपादन]
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥
नभि जनहितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी ॥
पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया
जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया
दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
