केशवसुतांची कविता वाचून

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

शिवरायाच्या मागें आम्ही लालमहालीं फिरणें
तसेंच तुमच्या मागें आम्ही नवीन कविता करणें
असेंच कांही कांही करुनी जीवित त्याला गणणें
'गोविंदाग्रज' म्हणे असे हे आम्हां लाजिरवाणें


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg