उदासीनता (बालकवी)
Jump to navigation
Jump to search
कोठुनि येते मला कळेना
- उदासीनता ही हृदयाला
काय बोंचतें तें समजेना
- हृदयाच्या अंतर्हृदयाला.
येथें नाहीं तेथें नाहीं,
- काय पाहिजे मिळवायाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
- हांका मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे
- घरें पाडिती पण हृदयाला.
तीव्र वेदना करिती, परि ती
- दिव्य औषधी कसली त्याला?
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |